महेंद्रसिंग धोनी याला भारतीय संघाचे कर्णधारपद का मिळाले? युवराज सिंग त्या संघात सिनियर होता तर माही त्याच्यापेक्षा ज्युनियर होता. मात्र, त्या भारतीय संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण याच्यासारखे वरीष्ठ खेळाडू होते. युवराज सिंगऐवजी महेंद्रसिंग धोनीला कर्णधार का करण्यात आले? यावर युवराज सिंगने वक्तव्य केले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्याशी झालेल्या संवादात युवराज सिंगने सांगितले की, सचिन तेंडुलकर आणि ग्रेग चॅपल यांच्यामुळे तो भारताचा कर्णधार बनला नाही, असे युवी म्हणाला.
युवराज सिंग (Yuvraj Singh) म्हणाला की, “मी माझ्या सहकाऱ्याच्या पाठीशी उभा राहिलो, ज्यासाठी मला ही शिक्षा मिळाली. याशिवाय बीसीसीआयच्या अनेक अधिकाऱ्यांचेही त्याच्याकडे लक्ष गेले नाही. मात्र, युवीने स्पष्टपणे सांगितले की, मला कर्णधार न झाल्याचा कोणताही पश्चाताप नाही. मला वाटते की, माझी भूमिका स्पष्ट होती. जर मला पुन्हा ते करावे लागले तर मी ते करेन, मला माझ्या निर्णयाचा कोणताही पश्चाताप नाही.”
संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवराज सिंगला विचारले, तुला भारतीय संघाचा कर्णधार बनण्याची इच्छा नव्हती का? या प्रश्नाला उत्तर देताना युवराज सिंग म्हणाला की, “माझी इच्छा कर्णधार व्हायची होती. मला वाटले होते की मी कर्णधार होईन, पण जेव्हा ग्रेग चॅपल (Greg Chappell) याचा वाद झाला तेव्हा माझ्याकडे दोन पर्याय होते, ग्रेग चॅपेलला पाठिंबा द्यायचा किंवा स्वतःला सपोर्ट करणाऱ्या संघाला. मी माझ्या संघाला सपोर्ट केला. पण बीसीसीआयच्या अनेक अधिकाऱ्यांना माझा निर्णय आवडला नाही. त्यानंतर ते म्हणाले की, माझ्याशिवाय तो इतर कोणत्याही खेळाडूला कर्णधार बनवू शकतो. हे मी ऐकले आहे. या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे हे मला माहीत नाही.”
पुढे बोलताना युवराज सिंग म्हणाला की, “त्याला अचानक उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले, त्यावेळी वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) संघात नव्हता. त्यानंतर 2007 च्या टी20 विश्वचषकासाठी एमएस धोनी (MS Dhoni) याला कर्णधार बनवण्यात आले. त्यावेळी निर्णय माझ्या विरोधात गेला असे मला वाटले. पण मला कसलाही पश्चाताप नाही. आज पुन्हा तशीच परिस्थिती असती तर मी तेच करेन, मी पुन्हा माझ्या सहकाऱ्यांसोबत उभा राहीन.” (Yuvraj Singh said the reason for not becoming the captain of Team India Said Because of Sachin and Greg Chappell)
महत्वाच्या बातम्या
पाकिस्तानच्या प्रमुख फलंदाजाचा क्रिकेटला अलविदा; सहकाऱ्यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन दिला निरोप, पहा व्हिडिओ
RCBने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड? ज्या खेळाडूला काढलं बाहेर, त्याने शतक ठोकून दिले सडेतोड उत्तर