वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख 28 सप्टेंबर होती. या अखेरच्या दिवशी यजमान भारतीय संघाने आधी जाहीर केलेल्या आपल्या 15 सदस्यीय संघात एक बदल केला. जखमी अष्टपैलू अक्षर पटेल याच्या जागी आता अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा विश्वचषकात खेळताना दिसेल. मात्र, भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याला हा निर्णय तितका पसंत नसल्याचे दिसून येते.
अक्षर पटेल याला आशिया चषकाच्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो आशिया चषक अंतिम फेरीत खेळू शकला नव्हता. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत देखील तो तंदुरुस्त होऊ शकला नाही. त्यामुळे अश्विनला विश्वचषकासाठी निवडले गेले.
याच मुद्द्यावर बोलताना युवराज म्हणाला,
“अक्षर पटेल नाही त्यामुळे सातव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करतो हे पाहावे लागेल. अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला असता, तर भारतीय संघाला डावखुरा फलंदाजीचा दुसरा पर्याय मिळाला असता, असे मला वाटत होते. मात्र, दुर्दैवाने त्याची निवड झाली नाही. सोबतच युझवेंद्र चहलचीही निवड झाली नाही.”
सुंदर याला आशिया चषक अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने बोलावले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याला एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
(Yuvraj Singh Said Washington Sundar Will Be There In World Cup Ahead Ravichandran Ashwin)
हेही वाचा-
World Cup Countdown: वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्याची हॅट्रिक करणारी ऑस्ट्रेलिया
सराव सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने-सामने, टॉस जिंकून रोहितने घेतली बॅटिंग; पाहा संघ