माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने रिषभ पंत (Rishabh Pant) आणि महान ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक-फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) यांच्यात समानता असल्याचे म्हटले आहे. युवराजने मधल्या फळीत फलंदाजी करताना पंतच्या खेळीचा सामन्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल सांगितले.
एका पॉडकास्टवर बोलताना युवराज म्हणाला, “रिषभमध्ये गिलख्रिस्टची झलक दिसते. कारण तो पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर येतो आणि खेळ बदलतो. खरं तर, गिलख्रिस्ट कसोटीत कसा खेळला याबद्दल मी पंतला खूप काही सांगतो. त्याने मधल्या फळीतील फलंदाजी बदलली. तो आपल्यासाठी कसोटीत पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर नक्कीच सामना जिंकवणारा फलंदाज आहे.”
पंतची आक्रमक शैली आणि त्याच्या फलंदाजीने सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता यामुळे अनेकदा गिलख्रिस्टशी तुलना केली जाते. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक-फलंदाजांच्या भूमिकेत क्रांती घडवून आणली. युवराजच्या टिप्पण्या भारताच्या कसोटी संघातील पंतच्या महत्त्वाच्या भूमिकेची वाढती ओळख प्रतिबिंबित करतात. जिथे त्याची स्फोटक फलंदाजी भारताच्या बाजूने सामना वळवण्यात महत्त्वपूर्ण ठरते.
युवराजची टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा पंत खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी एक प्रमुख खेळाडू म्हणून स्वत:ला स्थापित करत आहे. सामने जिंकवण्याच्या कामगिरीमुळे, ऑस्ट्रेलियासाठी गिलख्रिस्टप्रमाणेच पंतचा मधल्या फळीतील प्रभाव अधिक महत्त्वाचा ठरत आहे. पंतने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटीमध्ये, 26 वर्षीय खेळाडूने 34 सामने आणि 58 डाव खेळले आणि 74.11 च्या स्ट्राइक रेटने 2419 धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे, पंतनेही गिलख्रिस्ट हा आपला आदर्श असल्याचे सांगितले होते, तर अलीकडे गिलख्रिस्टनेही पंतचे खूप कौतुक केले होते. तो म्हणाला होता की, पंत हा असा फलंदाज आहे ज्याला पाहण्यासाठी तो पैसे खर्च करायला तयार असतो. पंतच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीची तुलना अनेकदा गिलख्रिस्टशी केली जाते जो कसोटीत उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहितच्या जडेजाबाबतच्या ‘त्या’ निर्णयावरुन भडकले मांजरेकर, थेट आकडेवारीच मांडली
कानपूर कसोटीत पुन्हा आठवला ‘गुटखामॅन’, 3 वर्षांपूर्वी झाला होता व्हायरल
‘या’ 3 खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये ठोकले सर्वाधिक षटकार!