जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद) गुरुवारी (२५ फेब्रुवारी) पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला १० विकेट्सने नमवले. या सामन्यापुर्वी दोन्ही संघ प्रत्येकी १ विजय मिळवत मालिकेत बरोबरीवर होते. त्यामुळे हा ५ दिवसीय कसोटी सामना अत्यंत चुरसीचा होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु अवघ्या २ दिवसातच हा सामना संपला.
या सामन्यादरम्यान फलंदाजांची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून आले, मात्र गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. यानंतर चाहत्यांपासून ते क्रिकेट दिग्गजांपर्यंत सर्वांनी अहमदाबादच्या खेळपट्टीला धारेवर धरले आहे. यात भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग यानेही उडी घेतली आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत युवराजने लिहिले आहे की, ‘सामना अवघ्या २ दिवसात संपला. निश्चितच हे कसोटी क्रिकेटसाठी चांगली बाब नाही. जर अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी गोलंदाजी केली असती; तर आज त्यांच्या नावे ८०० ते १००० कसोटी विकेस्टची नोंद असती.’
भलेही युवराजने अहमदाबादच्या खेळपट्टीवर टीका केली. परंतु तो भारतीय गोलंदाजाचे कौतुकही करायला विसरला नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यातील दमदार गोलंदाजी प्रदर्शनासाठी त्याने अक्षर पटेल, आर अश्विन आणि इशांत शर्मा यांचे अभिनंदन केले आहे.
finished in 2 days Not sure if that’s good for test cricket !If @anilkumble1074 and @harbhajan_singh bowled on these kind of wickets they would be sitting on a thousand and 800 ?🤔However congratulations to 🇮🇳 @akshar2026 what a spell! congratulations @ashwinravi99 @ImIshant 💯
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) February 25, 2021
तिसऱ्या कसोटी सामन्याचा थोडक्यात आढावा
तिसऱ्या कसोटी सामन्याविषयी बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला अवघ्या ११२ धावाच करता आल्या. भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने ६ आणि अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने ३ विकेट्स काढत इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आणला. यादरम्यान सलामीवीर जॅक क्राउले एकटा पन्नाशी पार धावा करू शकला.
प्रत्युत्तरात इंग्लंडच्या गोलंदाजांनीही भारतीय फलंदाजांची पुरती दैना करुन सोडली. कर्णझार जो रूटने सर्वाधिक ५ आणि तर जॅक लीचने ४ विकेट्स काढल्या. भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात ३० हून अधिक धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात इंग्लंडला फक्त ८१ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले आणि भारताला विजयासाठी ५० पेक्षा कमी धावांचे आव्हान मिळाले. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या जोडीने सहजरित्या हे आव्हान पार केले आणि संघाला १० विकेट्सने सामना जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
एक कर्णधार म्हणून मी आनंदी आहे की, तो माझ्या संघाचा भाग आहे; पाहा कुणाची केली कोहलीने प्रशंसा
“त्याच्यात क्षमता आहे, पण तो सतत चुकीचा…” गिलच्या खराब फलंदाजीवर भारतीय दिग्गजाने व्यक्त केली नाराजी
अन् तेव्हा कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रचला गेला होता इतिहास