---Advertisement---

क्रिकेट नाही तर आता या क्षेत्रातून मनोरंजन करणार युवराज सिंग

On: शनिवार, जून 29, 2019 8:14 PM
---Advertisement---

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराजने आता मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

तो नुकताच हॉटस्टार स्पेशलच्या ‘द ऑफीस’ या मालिकेच्या जाहिरातीत दिसून आला आहे. तो या मालिकेचा एक भाग असून त्याने या मालिकेत अभिनय केला आहे. ही मालिका द ऑफिस याच नावाने असलेल्या आंतरराष्ट्रीय मालिकेचा रिमेक आहे.

या मालिकेची जाहिरात करणारा छोटा भाग हॉटस्टारने ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये दिसते की युवराज मुकुल चढ्ढा यांच्या ऑफिसमध्ये नोकरी मागण्यासाठी जातो. यावेळी चढ्ढा युवराजची मुलाखत घेतात. पण युवराजला चढ्ढा हा बॉस पसंत न आल्याने तो या नोकरीला नकार देतो.

या मुलाखतीमध्ये जेव्हा चढ्ढा युवराजला विचारतात की तू आत्तापर्यंत काय काय विकले आहे. यावर युवराज उत्तर देतो की आत्तापर्यंत गाडी, चॉकलेट, टूथपेस्ट, फ्रिज आणि इंशुरन्सपण विकला आहे. पुढे युवराज म्हणाला तूम्ही सांगितले तर मी पेपर पण विकेल.

या मुलाखतीदरम्यान चढ्ढा युवराजकडून अनेक गोष्टींवर स्वाक्षरी करुन घेतात. तसेच युवराजची थ्रो-टेस्टही घेतली.

तसेच गमतीची गोष्ट म्हणजे युवराजला या मुलाखतीमध्ये क्रिकेटला हिंदीमध्ये काय म्हणतात असे देखील विचारले जाते आणि युवराज या प्रश्नाचे लंब-दंड-गोल पिंड-भाग-दौड़ प्रतियोगिता असे अचूक उत्तरही देतो. पण युवराजला चढ्ढा पटले नसल्याने अखेर तो या नोकरीला नकार देतो.

ही मालिका 13 भागांची असून ही 9-5 या वेळात विल्किन्स चावला येथे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नित्यक्रम दाखवणारी विनोदी मालिका आहे.

या मालिकेत मुकुल चढ्ढा, गौहर खान, रणवीर शोरे, गोपाल दत्त, सय्यंदीप सेनगुप्ता, समृद्धी देवान, प्रियंका सेतिया, अभिनव शर्मा, गाविन मेथालका, प्रीती कोचर, सुनील जेटली, चियान हो लिओ, नेहपाल गौतम आणि मयूर बन्सिवाल यांनी अभिनय केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

८ धावांवर बाद होऊनही फिंचचा झाला सचिन-हेडन सारख्या दिग्गजांच्या यादीत समावेश

भारताविरुद्धच्या सामन्यानंतर विंडीजच्या या खेळाडूला आयसीसीने सुनावली शिक्षा, जाणून घ्या कारण

करुणारत्ने असा नकोसा विक्रम करणारा विश्वचषक इतिहासातील पहिलाच कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment