---Advertisement---

चॅपेल प्रकरण झाले नसते, तर युवराज महान कर्णधार झाला असता, माजी संघसहकाऱ्याचा दावा

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय कारकिर्द उत्तम राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने  ग्रेग चॅपेल विवादात संघसहकाऱ्यांची साथ दिल्याने कर्णधारपद थोडक्यात गेले असा गौप्यस्पोट केला आहे. तर त्याचा साथीदार माजी फिरकीपटू हरभजन सिंगने या वादाविषयी बोलणे टाळले आहे. तो एक उत्तम कर्णधार ठरला असता असे मतही हरभजनने व्यक्त केले आहे.

युवराज (Yuvraj Singh) दोन वेळा विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे. त्याने पहिल्या टी२० विश्वचषकाच्या साखळी सामन्यात झटपट धावा करत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. २०११च्या वनडे विश्वचषकातही त्याने अष्टपैलू खेळी करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.

“युवराज कर्णधार असता तर आम्हाला खूप मेहनत करावी लागली असती. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे लागले असते. तो एक महान कर्णधार ठरला असता. त्याची महानता ही त्याच्या विक्रमातूनच दिसून येते,” असे हरभजनने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

पहिल्या टी२० विश्वचषकाआधी (२००७) भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यात राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वाखाली खेळला. यावेळी युवराज संघाचा उपकर्णधार होता. जेव्हा द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी टी२० विश्वचषकाच्या संघातून माघार घेतली तेव्हा युवराज संघाचा कर्णधार होईल अशा चर्चा होत होत्या. पण तो निर्णय शेवटच्या क्षणाला बदलत नवख्या एमएस धोनीचे नाव घोषित केले. या निर्णयाने निराश न होता त्याने स्पर्धेत उत्तम कामगिरी केली.

चॅपेल हे २००५ ते २००७ दरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्यात आणि सचिनमध्ये झालेल्या वादात युवराजने नेहमीच सचिनची बाजू घेतली. त्याचा हा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळांच्या काही अधिकाऱ्यांना आवडला नाही. यामुळेच त्याचे कर्णधारपद गेले असे वक्तव्य त्याने केले आहे. नंतर त्याला उपकर्णधार पदावरूनही हटवले गेले.

भारतीय संघाच्या कामगिरीत २०१३मध्ये मागे पडल्यावरही त्याची २०१४, २०१५ आणि २०१६ आयपीएलमध्ये चांगलीच मागणी वाढली होती. भारतीय संघात ४००पेक्षा अधिक सामने खेळल्यावरही त्याला संघाचे नेतृत्व करता न आल्याची खंत युवराजच्या मनात नेहमीच राहिल.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘तो वर्ल्डक्लास खेळाडू’, पराभवानंतरही विलियम्सनने गायले प्रतिस्पर्धी खेळाडूचे गोडवे

रहाणेच्या चपळ क्षेत्ररक्षणामागे चक्क मुंबई लोकलचा हात, स्वत: उपकर्णधारानेच केला होता गौप्यस्फोट

वनडेत ६ धावा देत ५ विकेट्स घेणारा खेडेगावातील सुपरस्टार ‘सुनिल जोशी’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---