---Advertisement---

या खेळाडूसाठी युवराज सिंग करणार शाहरुख खानला मेसेज

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ख्रिस लिनला(Chris Lynn) कोलकाता नाईट रायडर्सने(केकेआर) (Kolkata Knight Riders) आयपीएल 2020च्या लिलावाआधी संघातून मुक्त केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. विषेश म्हणजे लिनने त्याला मुक्त केल्यानंतर 18 नोव्हेंबरला टी10 (T10) लीगमध्ये खेळताना 91 धावांची खेळी केली आहे.

लिनने मराठा अरेबियन्सकडून खेळताना अबू धाबीविरुद्ध 30 चेंडूत नाबाद 91धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 7 षटकार मारले. त्यामुळे टी10 स्पर्धेतील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. हा पराक्रम करताना लिनने ऍलेक्स हेल्सने केलेल्या 87 धावांच्या खेळीचा विक्रम मोडला आहे.

लिनच्या या खेळीनंतर त्याचा मराठा अरेबियन्स संघातील संघसहकारी आणि भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने(Yuvraj Singh) म्हटले आहे की केकेआरने(KKR) लिनला मुक्त करुन मोठी चूक केली आहे.

पत्रकारांशी बोलताना युवराज म्हणाला, ‘ख्रिस लिनने आक्रमक खेळी केली. मी त्याला आयपीएलमध्ये पाहिले आहे. त्याने अनेकदा केकेआरला चांगली सुरुवात दिली आहे. मला समजत नाही असे असतानाही केकेआरने त्याला रिटेन का केले नाही. हा एक चूकीचा निर्णय आहे. मी याबद्दल शाहरुखला मेसेज पाठवणार आहे.’

लिनला केकेआरने 2018 च्या आयपीएल मोसमाच्या लिलावात 9.6 कोटी रुपये देऊन संघात घेतले होते. लिनने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये 41 सामने खेळताना 140. 65 च्या स्ट्राईक रेटने 1280 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

लिनने 18 नोव्हेंबरला अबूधाबीविरुद्ध केलेल्या 91 धावांच्या खेळीच्या जोरावर मराठा अरेबियन्सने 10 षटकात 138 धावा केल्या होत्या. त्यानंतर 139 धावांचा पाठलाग करताना अबूधाबी संघाला 10 षटकात 114 धावाच करता आल्याने 24 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---