---Advertisement---

युवराज सिंग आता खेळणार या नवीन संघाकडून

---Advertisement---

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तसेच भारतातील क्रिकेटला निरोप दिला असला तरी तो परदेशातील लीगमध्ये मात्र खेळणार आहे. आता तो 15 आणि 24 नोव्हेंबर दरम्यान आबू धाबीत होणाऱ्या टी10 लीग मध्ये खेळताना दिसणार आहे.

त्यामुळे आतापर्यंत कसोटी, वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये खेळणारा युवराज आता सर्वात कमी षटकांच्या क्रिकेट प्रकारात खेळताना पहायला मिळणार आहे.

आबू धाबीत होणाऱ्या 2019च्या टी10 लीगमध्ये युवराजला मराठा अरेबियन्स संघाने विकत घेतले आहे.

या लीगमध्ये खेळणारा युवराज हा पहिला भारतीय नसून यापूर्वी विरेंद्र सेहवाग, मुनाफ पटेल, आर. पी. सिंह आणि जहीर खान हे भारतीय ही लीग खेळले आहेत.

युवराज खेळणार असणाऱ्या मराठा अरेबियन्सच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक झिंबाब्वे संघाचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर आहेत.

युवराज सिंग संघात आल्यामुळे मराठा अरेबियन्सला मजबुती मिळाली आहे.

यावर्षी टी10 लीग 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ड्वेन ब्रावो मराठा अरेबियन्स संघाचा कर्णधार असणार आहे. त्यामुळे या लीगमध्ये युवराज सिंग ड्वेन ब्रावोच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

हा संघ मजबूत असून यावर्षी विजेतेपद मिळवेल, असा मराठा अरेबियन्स संघाच्या संघमालकांनी विश्वास व्यक्त केला आहे.

या स्पर्धेच्या 2018 च्या मोसमाचे विजेतेपद डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली नॉदर्न वॉरियर्स संघाने जिंकले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---