आयपीएल २०२१ स्पर्धेतील दोन अंतिम संघ निश्चित झाले आहेत. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर, बुधवारी(१३ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला होता.
या सामन्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या षटकापर्यंत कोणालाच अंदाज लावता येत नव्हता की या सामन्यात कोण विजय मिळवणार. दरम्यान, कोलकाताला २ चेंडूंमध्ये ६ धावांची आवश्यकता असताना, राहुल त्रिपाठीने गगनचुंबी षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला होता.
या सामन्यानंतर युवराज सिंगने एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्याने लिहिले की, “मला क्रिकेट आवडत नाही, तर माझे क्रिकेटवर प्रेम आहे. काय सामना रंगला हा!! कोलकाता नाईट रायडर्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला रिषभ पंत आणि त्याच्या संघातील खेळाडूंबद्दल खूप वाईट वाटतंय. परंतु हा खेळ आहे. यामध्ये कोणा एकालाच विजय मिळवण्याची संधी मिळते.”हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
I don’t like cricket ! I love it 😍!! What a game !!! #DCvsKKR congratulations @kkr for making it to the finals I feel for @RishabhPant17 and his boys . But that’s sport people ! there can be only one winner !!!
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 13, 2021
या निर्णायक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली होती. श्रेयस अय्यरने नाबाद ३० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटकांअखेर ५ बाद १३५ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली होती. तर शुबमन गिलने ४६ धावांचे योगदान दिले. शेवटच्या २ चेंडूवर ७ धावांची आवश्यकता असताना राहुल त्रिपाठीने षटकार मारून या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
सामना हारुनही दिल्लीनं जिंकली मनं! क्रिकेटविश्वातून अशा उमटल्या प्रतिक्रिया
सात धावासांठी तीन विकेट्सची आहुती! अखेर गगनचुंबी षटकार ठोकत कोलकाताचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
दोन ‘पुणेकर’ खेळाडू दिल्लीला पडले भारी, प्लेऑफमध्ये पराभवाला ठरले कारणीभूत, पाहा कामगिरी