आयपीएल २०२१ चा ३९ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स हे दोन मजबूत संघ समोरासमोर होते. या सामन्यादरम्यान फलंदाज आणि गोलंदाजांमधील तीव्र चढाओढ दिसून आली. दोन्ही संघांसाठी हा एक महत्त्वाचा सामना असल्याने खेळाडू अगदी तयार होते. मुंबईच्या राहुल चाहरने प्रथम बेंगलोरच्या केएस भारतला माघारी पाठवले आणि आक्रमक शैलीत त्याने आपला आनंद साजरा केला होता. त्यानंतर युझवेंद्र चहलनेही मोक्याच्या क्षणी मुबंईच्या ईशान किशनला बाद केल्यानंतर त्याच्या जवळ जाऊन काहीतरी बडबडला.
बेंगलोर विरोधी फलंदाजांवर दबाव निर्माण करत असताना ११ वे षटक टाकण्यासाठी चहल आला होता. चहल उत्कृष्ट स्पेल टाकत होता आणि त्याने आधी क्विंटन डी कॉकला बाद केल्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला होता. याच षटकात या लेग स्पिनरने ईशान किशनला बाद केले होते. ईशान किशनने चेंडू जोरात टोलावला पण क्षेत्ररक्षक हर्षल पटेलने त्याचा सहज झेल घेतला होता. बाद झाल्यानंतर चहल ईशानला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण ईशानने त्यास प्रतिसाद दिला नाही आणि तो परत डगआउटकडे गेला.
व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसते की, चहल ईशानला मी म्हटलं होत ना, असे काहीतरी हिंदी भाषेत म्हणताना दिसत आहे. यावरुन असे म्हणजे वावगे ठरणार नाही की, त्याने ईशानला पूर्वसूचना देत त्याची विकेट काढली होती.
https://twitter.com/CowCorner9/status/1442176395619102724?s=20
आत्तापर्यंत ईशान किशनसाठी हा आयपीएलचा हंगाम चांगला राहिलेला नाही. गेल्या काही सामन्यांपासून त्याची लय गेल्याचे दिसत आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत ८ डावांमध्ये १०७ धावा केल्या आहेत. या स्पर्धेनंतर लगेचच टी२० विश्वचषक खेळला जाईल, त्यामुळे भारतीय संघ ईशान बाबत अधिक चिंताग्रस्त असेल.
ईशान किशनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची शानदार सुरुवात केली होती. इंग्लंडविरुद्ध टी२० पदार्पण करताना त्याने अर्धशतकी खेळी केली होती. पुढे एकदिवसीय स्वरुपात पदार्पण करत या सामन्यांतही चांगली कामगिरी सुरूच ठेवली. तसेच श्रीलंका दौऱ्यावरही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याने तो टी२० विश्वचषक संघात निवडला गेला आहे. मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी त्याची निवड केली आहे. त्याला पर्यायी सलामीवीर म्हणून निवडण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वडिलाचे हाल लेकाला बघवले नाहीत, डिव्हिलियर्सला बाद होताना पाहून मुलाचा संताप, व्हिडिओ व्हायरल
‘मॅच विनिंग’ प्रदर्शन करत जडेजा बनला ‘मॅच ऑफ द मॅच’, खास व्यक्तीला पुरस्कार केला समर्पित