---Advertisement---

‘मॅच विनिंग’ प्रदर्शन करत जडेजा बनला ‘मॅच ऑफ द मॅच’, खास व्यक्तीला पुरस्कार केला समर्पित

On: रविवार, सप्टेंबर 26, 2021 11:44 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज संघ हा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. या संघाती एकाहून एक सरस खेळाडूंची भरमार आहे. त्यातील एक म्हणजे, अष्टपैलू रविंद्र जडेजा. फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षणात पटाईत असलेल्या जडेजाने गेल्या काही वर्षांत संघासाठी महत्त्वपूर्ण प्रदर्शन केले आहे. याच कारणामुळे त्याला चेन्नई संघाचा हुकुमी एक्का म्हटले जाते.

रविवार रोजी (२६ सप्टेंबर) अबु धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने आपल्या धडाकेबाज प्रदर्शनाने हातून निसटता सामना जिंकून दिला. त्याच्या या प्रदर्शनाच्या जोरावरच त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला. यानंतर त्याने एका खास व्यक्तीला हा पुरस्कार समर्पित करत क्रिकेटरसिंकांची मने जिंकली आहेत.

चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १७१ धावा केल्या होत्या. यादरम्यान जडेजाने अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या राहुल त्रिपाठीची मोठी विकेट चटकावली होती. १२.२ षटकात त्रिपाठीला त्रिफळाचीत करत त्याने त्याच्या ४३ धावांच्या खेळीवर पूर्णविराम लावला होता. गोलंदाजीनंतर फलंदाजतही तो संघाचा तारणहार ठरला.

भक्कम सुरुवातीनंतर चेन्नई संघाच्या एकामागून एक विकेट पडत होत्या. अठराव्या षटकापर्यंत संघ ६ बाद १४२ धावा अशा बिकट स्थितीत पोहोचला होता. मात्र यावेळी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत जडेजाने ८ चेंडूंमध्ये २२ धावांची तूफानी खेळी केली होती. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे संघाने शेवटच्या चेंडूवर २ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला.

त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामना संपल्यानंतर सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यानंतर त्याने सामनावीर पुरस्कारासोबतचा आपला फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या लाडक्या लेकीला हा पुरस्कार समर्पित केला आहे. मुलगी दिनाचे (Daughters Day) औचित्य साधून त्याने मुलगी निध्यानासाठी ही खास भेट दिली आहे.

https://www.instagram.com/p/CUSm4ghFkTy/?utm_source=ig_web_button_share_sheet

केवळ एकटा जडेजाच नव्हे तर, सचिन तेंडूलकरनेही त्याची मुलगी सारा तेंडूलकरसोबतचा फोटो शेअर करत त्याच्या मुलीला या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

चपळ क्षेत्ररक्षण, ते हेच…! फाफचा सीमारेषेवर ‘फाडू’ झेल, केकेआरच्या कर्णधाराला धाडलं तंबूत

व्हिडिओ: जड्डूचा ‘क्लासिक चोप’, १९ व्या षटकात ‘असा’ पालटला सामना, धोनी-रैनाकडूनही टाळ्यांचा गजर

‘रनमशीन’ विराटचा आयपीएलमध्येही बोलबाला! ‘असा’ कारनामा करत घातली मोठ्या विक्रमाला गवसणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---