हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(31 जानेवारी) पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाचा डाव 30.5 षटकात 92 धावांवर रोखला.
भारताच्या या डावात सर्वाधिक धावा युजवेंद्र चलहने केल्या आहेत. त्याने 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 18 धावा केल्या. त्यामुळे 10 व्या क्रमांकाच्या फलंदाजाने वनडेत भारताच्या डावातील सर्वाधिक धावा करण्याची ही केवळ दुसरी वेळ ठरली आहे.
याआधी 1998 मध्ये टोरंटो येथे पाकिस्तान विरुद्ध जवागल श्रीनाथ यांनी 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 43 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यातील ही भारतीय संघाकडून केलेली सर्वोच्च खेळी होती. त्या सामन्यात भारत 180 धावांत सर्वबाद झाला होता.
भारताकडून आज चहल व्यतिरिक्त शिखर धवन(13), कुलदीप यादव(15) आणि हार्दिक पंड्या(16) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.
महत्त्वाच्या बातम्या-
–२०१० नंतर भारतीय संघावर ओढावली अशी नामुष्की
–टीम इंडियाबाबतीत सातव्यांदाच घडले असे काही!
–अखेर विराटचा तो विक्रम मोडण्यात रोहित शर्माला आले अपयश