भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी संघात काही बदल केले गेले. मात्र, अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल याला संघात आपली जागा बनवण्यात अपयश आले. त्यामुळे आगामी काळात त्याला वनडे संघात जागा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसत आहे.
भारतीय संघाने यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सहभाग घेतला होता. मालिकेतील पहिल्या सामन्यात युजवेंद्र चहल संघाचा प्रमुख फिरकीपटू म्हणून खेळलेला. या सामन्यात त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादव याला संधी मिळाली. त्याने या संधीचा फायदा उठवत दोन सामन्यात पाच बळी आपल्या नावे केले. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्या पसंतीचा फिरकीपटू म्हणून कुलदीप याला संधी देण्यात आली. त्यानेही 8 षटकात 2 बळी मिळवत ही निवड सार्थ ठरवली.
भारतात यावर्षी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. त्यामध्ये केवळ एका लेगस्पिनरला संधी मिळू शकते. त्यामुळे सहल व कुलदीप यांच्यामध्ये या जागेसाठी स्पर्धा असेल. दोघांच्या आत्तापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय वनडे कारकीर्दीचा विचार केल्यास चहलने 74 सामन्यात 90 बळी टिपले आहेत. दुसरीकडे कुलदीपने 76 सामन्यात 126 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. चहलच्या तुलनेत कुलदीपचा इकॉनॉमी रेट ही चांगला आहे.
वनडे विश्वचषकासाठी रवींद्र जडेजा व अक्षर पटेल मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या फिरकीपटूच्या जागी चहल व कुलदीप यापैकी एकालाच संधी मिळू शकते. अशा स्थितीत चहल सातत्याने संघाबाहेर राहिल्यास त्याला विश्वचषकाला मुकावे लागू शकते.
(Yuzvendra Chahal Again Out Of ODI Team Kuldeep Yadav In Strong Position)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉसचा निकाल भारताच्या पारड्यात! दोन धुरंधरांचे पुनरागमन, तर ईशानचाही ताफ्यात समावेश
सरफराजने शतक ठोकल्यानंतर ‘सिद्धू मूसेवाला’च्या अंदाजात केले सेलिब्रेशन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध