भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा 20 मार्च रोजी अधिकृत घटस्फोट झाला. यापूर्वी एक वृत्त आले होते की चहल आणि धनश्री यांनी सुसंगततेच्या समस्यांमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता, एक अहवाल समोर येत आहे, ज्यात त्यांच्यातील मतभेदांचे खरे कारण एकत्र राहण्याच्या प्रश्नावर निर्माण झालेली असहमती होते. राहण्याच्या ठिकाणावरून दोघांमध्ये मतभेद वाढले आणि या वादातूनच नात्यातील अंतर अधिक गहिरं झालं. शेवटी, त्यांनी स्वतंत्र मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
ज्येष्ठ पत्रकार विकी लालवानी यांच्या मते, लग्नानंतर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हरियाणामध्ये राहू लागले. तथापि, लग्नाच्या काही दिवसांनंतर, धनश्रीने मुंबईत स्थलांतरित होण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु चहलने ते मान्य केले नाही. चहलची इच्छा होती की त्याची पत्नी त्याच्या पालकांसोबत हरियाणामध्ये राहावी.
विकी लालवानी यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “लग्न झाल्यानंतर युझवेंद्र चहल आणि धनश्री हरियाणामध्ये चहलच्या पालकांसोबत राहायला गेले आणि गरज पडल्यासच मुंबईत आले. या मुंबई-हरियाणामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांचे लग्न तुटले. खरंतर, युझवेंद्र त्याच्या पालकांसोबत आणि धनश्रीसोबत मुंबईत राहायचे होते.”
बार अँड बेंचच्या अहवालानुसार, युझवेंद्र चहलने धनश्री वर्माला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. घटस्फोटापूर्वी युजवेंद्र चहलने धनश्रीला 2.37 कोटी रुपये दिल्याचे बोलले जात आहे. तर घटस्फोट झाल्यानंतर 2.38 कोटी रुपये देण्यात आले.






