आयपीएल 2023 चा आठवा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाईल. बुधवारी (5 एप्रिल) सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत आमने सामने असणाऱ्या दोन्ही संघांनी हंगामातील आपला पहिला सामना जिंकला आहे. अशात सलग दुसऱ्या विजयासाठी संघ प्रयत्न करतील. पहिल्या सामन्यात आपल्या संघासाठी मॅच विनर ठरलेल्या खेळाडूंना या सामन्यासाठीही प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाईल.
उभय संघांतील हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे, राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राउंड म्हणून घोषित करण्यात आले आहे. राजस्थानने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 72 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसरीकडे पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला होता. पंजासाठी बुधवारी (5 एप्रिल) राजस्थाविरुद्ध खेळताना एक गोलंदाज डोकेदुखी ठरू शकतो. फिरकीपटू युझवेंद्र चहल पंजाब किंग्जविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. त्याने या संघाविरुद्ध आतापर्यंत 28 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच हंगामातील आपल्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ड याचे प्रदर्शन देखील पहिल्या सामन्यात चांगले राहिले.
हंगामातील आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात येणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या सामन्यात सामन्याच्या तुलनेत या सामन्यात संजू सॅमसन संघातील एका फलंदाजाला विश्रांती देऊन एक अतिरिक्त गोलंदाज खेळवू शकतो. कारण गुवाहाटीची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असू शकते.
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन –
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयसवाल, जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन (कर्णधार / यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युजवेंद्र चहल.
पंजाब किंग्स: शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सिकंदर रजा, शाहरुख खान, सॅम करन, नाथन एलिस, हरप्रीत बरार, राहुल चाहर, अर्शदीप सिंह.
(Yuzvendra Chahal can be a big obstacle for Punjab Kings, see the probable playing eleven)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविस्मरणीय खेळी: गांगुलीने ‘तो’ निर्णय घेतला अन् धोनीने पहिलं-वहिलं शतक झळकावत स्वत:ला सिद्ध केलं
रिषभच्या उपस्थितीत दिल्लीची हार! सलग दुसऱ्या विजयासह गुजरात टायटन्स अव्वलस्थानी