कार्डीफ। भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारी, 6 जुलैला दुसरा टी20 सामना होणार आहे. या सामन्याआधी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने गमतीने सुरेश रैनाला आपण फलंदाजीच्या टीप्स दिल्या असल्याचे म्हटले आहे.
झाले असे की चहलने 5 जुलैला सरावा दरम्यानचा फोटो इंस्टाग्रामवरुन शेअर केला आहे. यात चहल फलंदाजासारखी कृती करताना दिसत आहे. तर रैना त्याच्याशी काही बोलत आहे. तसेच या फोटोत या दोघांच्या शेजारी उमेश यादवही उभा आहे.
चहलने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की, ” सुरेश भैय्याला काही बॅटिंग टिप्स देत आहे.”
https://www.instagram.com/p/Bk2wAFNnwT6/?hl=en&taken-by=yuzi_chahal23
यानंतर चहलच्या या पोस्टवर रैनाने उत्तर देताना म्हटले आहे की, ” मला षटकाराची गरज आहे एका धावेची नाही. पण सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद.” याबरोबरच रैनाने हसण्याची इमोजीही टाकली आहे. रैनाच्या या उत्तरावर चहलने पुन्हा उदास असल्याची इमोजी टाकली.
चहलच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
-केवळ ६ तासात हा विक्रम होऊ शकतो कुलदिप यादवच्या नावावर
-भारत इंग्लंडला तिन्ही मालिकेत धूळ चारणार, पाकिस्तानच्या माजी दिग्गज फलंदाजाची भविष्यवाणी
-उद्या ३७वा वाढदिवस साजरा करणाऱ्या धोनीला आज ३ खास विक्रम साजरे करण्याची संधी