मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाच्या सुरुवातीपासूनच रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये अनेक विक्रमही झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, रविवारी (१० एप्रिल) देखील राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज युजवेंद्र चहल याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
रविवारी २० वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Rajasthan Royals vs Lucknow Super Giants) संघात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे अखेरच्या क्षणी ३ धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या विजयाच्या हिरोंपैकी एक हिरो युजवेंद्र चहल ठरला. त्याने ४ षटकांत ४१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. याबरोबर त्याने आयपीएलमध्ये १५० विकेट्सचा टप्पा पार केला. हा टप्पा पार करणारा तो सहावा गोलंदाज ठरला आहे.
चहलपूर्वी ड्वेन ब्रावो, लसिथ मलिंगा, अमित मिश्रा, पियुष चावला आणि हरभजन सिंग यांनी असा पराक्रम केला आहे. चहलच्या आता आयपीएलमध्ये ११८ सामन्यांत २१.३४ च्या सरासरीने आणि ७.५५ च्या इकोनॉमी रेटने १५० विकेट्स पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये हरभजन सिंगची बरोबरी केली आहे. हरभजन सिंगने देखील आयपीएलमध्ये १५० विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर १७३ विकेट्ससह ड्वेन ब्रावो आहे (Most Wickets in IPL).
याशिवाय चहल (Yuzvendra Chahal) हा आयपीएलमध्ये सर्वात जदल १५० विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही ठरला आहे. त्याने ड्वेन ब्रावोला या यादीत मागे टाकले आहे. ब्रावोने १३७ सामन्यांत १५० आयपीएल विकेट्स पूर्ण केल्या होत्या. या यादीत अव्वल क्रमांकावर लसिथ मलिंगा असून त्याने १०५ आयपीएल सामन्यांत १५० विकेट्स पूर्ण केल्या होत्या (Fastest to 150 wickets in IPL).
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
१७३ विकेट्स – ड्वेन ब्रावो
१७० विकेट्स – लसिथ मलिंगा
१६६ विकेट्स -अमित मिश्रा
१५७ विकेट्स – पियुष चावला
१५० विकेट्स – युजवेंद्र चहल
१५० विकेट्स – हरभजन सिंग
आयपीएलमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेणारे गोलंदाज
१०५ सामने – लसिथ मलिंगा
११८ सामने- युजवेंद्र चहल
१३७ सामने – ड्वेन ब्रावो
१४० सामने – अमित मिश्रा
१५६ सामने – पियुष चावला
१५९ सामने – हरभजन सिंग
राजस्थानने जिंकला सामना
या सामन्यात राजस्थानने २० षटकांत ६ बाद १६५ धावा केल्या. त्यांच्याकडून शिमरॉन हेटमायरने ३६ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या. तसेच लखनऊकडून कृष्णप्पा गॉथम आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच राजस्थानने (LSG vs RR) दिलेल्या १६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाला २० षटकांत ८ बाद १६५ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना ३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागाला.
राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच अखेरच्या षटकात कुलदीप सेनने १५ धावांचे यशस्वी रक्षण करत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच चहलने घेतलेल्या ४ विकेट्समुळे तो सामनावीर ठरला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
Video : आऊट नसताना दोनदा Out दिला आणि जेव्हा खरंच Out होता तेव्हा रहाणेनी ‘चिटींग’ केली
रिटायर्ड आऊट म्हणजे काय रे भावा? आर अश्विनने आयपीएलमध्ये असेच बाद होत घडवलाय इतिहास
IPL2022| हैदराबाद वि. गुजरात सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!