---Advertisement---

टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, युजवेंद्र चहलच्या नावे आणखी एक विक्रम

On: बुधवार, मे 8, 2024 4:22 PM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्सचा अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहल यानं मंगळवारी क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव कोरलं. चहल टी20 क्रिकेटमध्ये 350 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्यानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रिषभ पंतची विकेट घेत ही कामगिरी केली.

आयपीएल 2024 च्या 56 व्या सामन्यात युजवेंद्र चहलनं 4 ओव्हरमध्ये 48 धावा देत एक विकेट घेतली. चहलनं दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला ट्रेंट बोल्टकडे झेलबाद करून टी20 क्रिकेटमधील आपले 350 बळी पूर्ण केले.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. ब्राव्होनं 573 सामन्यांमध्ये 625 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान आहे, ज्यानं 424 सामन्यांत 572 विकेट घेतल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू सुनील नारायण या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजच्या या माजी फिरकीपटूनं 509 सामन्यांत 549 विकेट घेतल्या आहेत.

युजवेंद्र चहल टी20 क्रिकेटमध्ये 350 विकेट घेणारा एकूण पाचवा फिरकी गोलंदाज आहे. चहलच्या आधी राशिद खान (572), सुनील नारायण (549), इम्रान ताहिर (502) आणि शाकिब अल हसन (482) यांनी ही कामगिरी केली आहे.

युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्यानं आयपीएलच्या 156 सामन्यांमध्ये 22.25 ची सरासरी आणि 7.83 च्या इकॉनॉमी रेटनं 201 बळी घेतले आहेत. तो आयपीएलमध्ये 200 बळींचा टप्पा गाठणारा एकमेव गोलंदाज आहे. याशिवाय युजवेंद्र चहल हा भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. चहलनं भारताकडून 80 टी20 सामन्यांमध्ये 96 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 25.09 आणि इकॉनॉमी 8.19 एवढी आहे.

आयपीएलच्या या हंगामातही युजवेंद्र चहलची कामगिरी अपेक्षेप्रमाणे उत्तमच राहिली. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 29.71 च्या सरासरीनं 14 बळी घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करणारे 4 अनकॅप्ड भारतीय वेगवान गोलंदाज, लवकरच टीम इंडियामध्ये मिळू शकते जागा

पॅट कमिन्सचा आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण? ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं दिलं अनपेक्षित उत्तर

दिल्ली कॅपिटल्सनं घेतला मागील पराभवाचा बदला, राजस्थानवर 20 धावांनी विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---