---Advertisement---

चहलची फिरकी घेतेय भल्याभल्यांची गिरकी, मलिंगालाही मागे सोडत युझीने रचलाय इतिहास

On: शनिवार, मे 7, 2022 6:36 PM
Yuzvendra-Chahal
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमध्ये फलंदाजांइतकाच गोलंदाजांचाही बोलबाला पाहायला मिळाला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातही एकीकडे जोस बटलर, शिखर धवन, हार्दिक पंड्या, डेविड वॉर्नरसारखे फलंदाज धुमाकूळ घालत आहेत. दुसरीकडे युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, उमरान मलिक अशा गोलंदाजांनीही सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. त्यातही चहल चालू हंगामात अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन करत असून नुकताच त्याने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.

शनिवारी (०७ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात आयपीएल २०२२चा (IPL 2022) ५२वा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान राजस्थानचे प्रतिनिधित्त्व करताना चहलने (Yuzvendra Chahal) ४ षटके गोलंदाजी करताना २८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. जॉनी बेयरस्टो, भानुका राजपक्षे आणि पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल यांना त्याने बाद केले.

यासह त्याने चालू हंगामातील २० विकेट्सचा आकडा पार केला आहे. सध्या त्याच्या खात्यात सर्वाधिक २२ विकेट्स असून पर्पल कॅपही त्याच्याच डोक्यावर सजून आहे. यासह तो ४ वेगवेगळ्या आयपीएल हंगामात २० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिलाच फिरकीपटू ठरला आहे. यापूर्वी त्याने २०१५, २०१६ आणि २०२० साली ही कामगिरी केली होती. 

२०१५ मध्ये त्याने १५ सामने खेळताना २३ विकेट्स घेतल्या होत्या. तर २०१६ साली २१ विकेट्स खात्यात नोंदवल्या होत्या. पुन्हा पुढील ३ हंगामात सरासरी प्रदर्शन केल्यानंतर २०२० मध्ये त्याने १५ सामन्यांमध्ये २१ विकेट्स चटकावल्या होत्या. 

https://twitter.com/kaustats/status/1522898793406296064?s=20&t=8NhLfYnaeVO25rQIdZvs7g

याबरोबरच चहलने एका हंगामात सर्वाधिक वेळा २० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याच्या अद्वितीय कामगिरीत लसिथ मलिंगा आणि सुनील नारायण यांनाही मागे सोडले आहे. मलिंगा आणि नारायण यांनी प्रत्येकी ३ वेळा हा पराक्रम केला होता. मलिंगाने २०११, २०१२ आणि २०१५ मध्ये २० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या होत्या. तर नारायणने २०१२, २०१३ आणि २०१४ मध्ये हे काम केले होते. 

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

द्रविडच्या १७ वर्षांपूर्वीच्या निर्णयावर युवराजचा निशाणा, ‘मुलतान कसोटीत सचिनचे द्विशतक व्हायला हवे होते’

राजस्थानच्या कॅम्पमध्ये मस्तीचे वारे, चहल-बटलरचा ‘बल्ले नी बल्ले’ गाण्यावर डान्स; सिग्नेचर पोजही केली

‘आम्ही चुका केल्या, ज्याचे परिणाम भोगावे लागले’, पराभवानंतर हार्दिक पंड्याने सांगितली कुठे झाली चूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---