---Advertisement---

टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूचे बांग्लादेशविरुद्ध आकडे शानदार, रोहित शर्मा संघात संधी देणार का?

On: शनिवार, जून 22, 2024 3:54 PM
Yuzvendra Chahal Rohit Sharma
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ आपल्या सुपर-8 फेरीत दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशविरुद्ध लढणार आहे. हा सामना सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड,अँटिग्वा येथे आज (22 जून) होणार आहे. भारतीय संघात असा एक गोलंदाज आहे, जो या स्पर्धेत बेंचवर आहे. त्याला एकही सामन्यात संधी मिळाली नाही. या गोलंदाजाने बांग्लादेश विरुद्ध जितके टी20 सामने खेळला आहे. त्या सर्व सामन्यात त्याने विकेट्स मिळवल्या आहेत. तर तो गोलंदाज भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल आहे. चहल बांग्लादेशविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून सर्वीधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की रोहित शर्मा चहलला प्लेइंग इलेव्हन मध्ये जागा देणार का?

युझवेंद्र चहलने बांग्लादेशविरुद्ध 6 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे त्यामधील सर्व सामन्यात त्याने कमीत कमी 1 तर विकेट घेतला आहे. तो भारतीय संघाकडून या संघाविरुद्ध सर्वाधिक 9 विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. पण यंदाच्या टी20 विश्वचषकात चहलला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यासह युझवेंद्र चहल भारतीय संघासाठी टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने भारतासाठी 80 टी20 सामने खेळला आहे. ज्यामध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत. आश्यचर्यकारक म्हणजे युझवेंद्र चहलने टी20 विश्वचषकाचा एकही सामना खेळलेला नाही. अश्या स्थितीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा त्याला संघात शामील करणार का शेवटच्या सामन्यातीलच प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवणार हे बघणं योग्य राहील.

दोन्ही संघाच्या हेड टू हेड बाबत बोलायचे झाले तर भारत आणि बांग्लादेश यांच्यात 13 टी20 सामने खेळले आहेत ज्यामध्ये भारताने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात बांग्लादेशला विजयाची चव चाखता आली आहे. तर टी20 विश्वचषकात या दोन्ही संघ 4 वेळा आमने सामने आले आहेत. भारतीय संघाने चारही वेळेस सामना आपल्या नावे केला आहे.

महत्तवाच्या बातम्या-

वर्ल्डकपच्या झगमगाटापासून दूर, माही मित्रांसोबत लुटतोय सुट्यांचा आनंद! पाहा व्हिडिओ
“विराट कोहलीनं या क्रमांकावर फलंदाजी करावी”, खास मित्र एबी डिव्हिलियर्सच्या सूचना
एका संघाचा उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पत्ता कट, तर दुसरा संघ बाहेर जाणाच्या वाटेवर सुपर 8 ची स्थिती काय?

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---