चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना सुरू आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या या बातमी आखेरीस 49 व्या षटकानंतर न्यूझीलंडने 7 गडी गमावून 239 धावा केल्या आहेत. मायकेल ब्रेसवेल आणि नॅथन स्मिथ क्रीजवर आहेत, ज्यापैकी ब्रेसवेल सध्या अर्धशतकाजवळ आहे. भारतीय फिरकीपटूंनी प्रभावी गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले आहे.
टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या संघाबाहेर असला तरी क्रिकेटपासून तो दूर राहू शकत नाही. चॅम्पियन्स ट्राॅफीच्या सामन्यात तो स्टँडमधून आपल्या संघाला पाठिंबा देताना दिसला. मात्र, त्याची उपस्थिती जितकी चर्चेत होती, त्याच्याबरोबर असलेली ती खास व्यक्ती यामुळेच त्यावर अजूनच चर्चा रंगली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चहलसोबत दिसलेली व्यक्ती आरजे महावेश आहे. विशेष म्हणजे, चहलच्या पत्नी धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेले असताना हा फोटो समोर आला आहे. या नव्या चर्चांनी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून, सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Yuzvendra Chahal in the stands for CT Final. pic.twitter.com/uJXZAGKJ9b
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 9, 2025
चहलच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक कयास लावले जात असले तरी याबाबत त्याने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. क्रिकेटच्या मैदानावरून स्टँडपर्यंत, चहलच्या प्रत्येक हालचालींवर चाहत्यांची करडी नजर असते, हे मात्र नक्कीच म्हणावं लागेल.
हेही वाचा-
अनुष्का शर्माने व्यक्त केली निराशा, कुलदीप यादवच्या यशाने मिळाला जल्लोषाचा क्षण!
मैदानातच रोहितची विशेष पूजा, जर्सीवर हात ठेवून घेतली देवाची कृपा!






