सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताच्या रोहित शर्माने त्याचे वन-डे मधील २२वे आतंरराष्ट्रीय शतक केले. मात्र या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभूत व्हावे लागले.
हा सामना संपल्यावर भारतीय फिरकीपटू यजुवेंद्र चहलने रोहितची मुलाखत घेतली आहे. चहल टीव्ही नावाने होणाऱ्या या शोमध्ये भारतीय संघाचे विविध दौऱ्यामधील मुलाखती चहलने घेतल्या आहेत.
आजच्या भागात चहलने रोहितला त्याच्या शतकी खेळीबद्दल प्रश्न विचारला होता. यामध्ये शिखर धवनसोबत फलंदाजीला आलेल्या रोहितने नवीन चेंडूवर चांगला खेळ करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलो होतो, असे म्हटले आहे.
“जेव्हा आम्ही दोघांनी फंलदाजी करायला सुरूवात केली त्याआधीच आम्ही चांगला खेळ करण्याचा विचार केला होता. यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचीचे व्हिडीओ बघितले होते. त्यांचे गोलंदाज उत्तम आहेत. पण आम्ही ठरवल्याप्रमाणे झाले नाही”, असे रोहित म्हणाला.
या सामन्यात भारताने सलामीवीर शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि अंबाती रायडू यांच्या विकेट्स लवकरच गमावल्या होत्या.
या शोमध्ये चहलने रोहितला एमएस धोनी सोबतच्या भागीदारीविषयीही प्रश्न विचारला होता.
“धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा आम्ही दोघांनी भक्कम भागीदारी करण्याचा विचार केला होता”, असे उत्तर रोहितने दिले आहे.
WATCH: In our fun segment of Chahal TV, we bring you up close with centurion @ImRo45 from Sydney 😁😁 – by @RajalArora
You think @yuzi_chahal did a good job?
Full Video Link 📽️📽️👉👉 https://t.co/6V0258Zmtz pic.twitter.com/O5B7YxTDod
— BCCI (@BCCI) January 13, 2019
यावेळी रोहितने त्याचे मत व्यक्त करताना कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी फलंदाजी क्रमांकाविषयी विचार करावा असे म्हटले आहे.
‘धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला यावे’, अशी इच्छाही रोहितने व्यक्त केली आहे.
या सामन्यात रोहित आणि धोनी यांनी १३७ धावांची भागीदारी करताना सामना ३बाद ४ धावांवरुन वरून ३ बाद १४१ धावांपर्यंत आणला होता. मात्र धोनीला चुकीचे बाद दिल्याने आणि नंतरच्या विकेट्स लवकर गेल्याने भारताला हा सामना गमवावा लागला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरा वन-डे सामना १५ जानेवारीला अॅडलेड येथे खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माने विव रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला