भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने त्याच्या वैवाहिक जीवनात प्रवेश केला आहे. त्याने मंगळवारी (२२ डिसेंबर) धनश्री वर्माशी लग्नगाठ बांधली. युझवेंद्र आणि धनश्री यांचा विवाह सोहळ नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत गुरुग्राम येथे पार पडला. त्यांचा विवाह झाल्यानंतर या दोघांनी सोशल मीडियाचा आधार घेत त्यांच्या लग्नाची बातमी सर्वांपर्यंत पोहचवली.
त्यांच्या या विवाह सोहळ्यातील अनेक खास क्षणांचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले आहेत.
https://www.instagram.com/p/CJGrpDLMoAo/
https://www.instagram.com/p/CJGrnk2ldw4/
https://www.instagram.com/p/CJJGYZisBlC/
भारतीय संघातील सर्वात खट्याळ खेळाडू म्हणून ओळखला जाणारा चहल भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघातील नियमित सदस्य आहे. तर त्याची पत्नी धनश्री ही डॉक्टर (डेंटिस्ट) आहे. तसेच ती प्रसिद्ध युट्यूबर असून तिचा युट्यूबवर चॅनेलही आहे. यावर ती तिचे डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. ती डान्स कोरियोग्राफारही आहे. युट्यूबवर तिच्या चॅनेलला १ मिलियनपेक्षाही अधिक सबस्क्रायबर आहेत.
https://www.instagram.com/p/CJLUg0NM_qN/
https://www.instagram.com/p/CJJGX97lYcN/
https://www.instagram.com/p/CJK2qdAF5g_/
या नवविवाहित दांपत्याला अनेक क्षेत्रातील सेलिब्रेटींनी विवाहनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CJGxCjij00D/
धनश्री आणि युझवेंद्र यांचा साखरपुडा याचवर्षी ८ ऑगस्ट रोजी पार पडला आहे. याबद्दलही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती.
https://www.instagram.com/p/CDoB1dPlfK4/
साखरपुड्यानंतर धनश्री युझवेंद्रसह आयपीएल 2020 साठी युएईला देखील गेली होती. यावेळी ती युझवेंद्रला स्टेडियममधून प्रोस्ताहन देतानाही दिसली होती. त्यानंतर युझवेंद्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तो मर्यादीत षटकांच्या मालिकानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारतात परतला. त्यानंतर लगेचच त्याने आणि धनश्रीने लग्न केले.
महत्त्वाच्या बातम्या –
माजी भारतीय कसोटीपटूने केली ‘या’ खेळाडूची सलामीवीर म्हणून शिफारस
ती म्हणाली, ‘फुलं मला आनंद देतात’ आणि केएल राहुलने थेट…
यावर्षी फक्त तुमचीच हवा! आंतराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ३ गोलंदाज