---Advertisement---

भारतीय संघातील या क्रिकेटपटूला येतेय धोनीची आठवण, भावनिक पोस्ट करत…

On: सोमवार, मे 4, 2020 4:24 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) लॉकडाऊनमुळे (Lockdown) जास्तच सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. तो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवरून अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. अशाच प्रकारे त्याने रविवारी (३ मे) धोनी आठवण काढत एक भावूक पोस्ट केली. त्याने अनेकवेळा आपल्या यशाचे श्रेय धोनीला दिले आहे.

चहलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून धोनीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, “यष्टीमागून महान खेळाडू धोनीचे मला तिल्ली या नावाने आवाज देणे मी खूप मिस करत आहे.”

https://www.instagram.com/p/B_uDIaQh4S9/?utm_source=ig_web_copy_link

चहलची ही पोस्ट लाखो लोकांनी लाईक केली आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सही केल्या आहेत.

खरंतर धोनी भारतीय संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तो यष्टीरक्षणादरम्यान सर्व खेळाडूंना त्यांच्या टोपणनावाने पुकारत असतो. कर्णधार विराट कोहलीनेदेखील (Virat Kohli) एका मुलाखतीत सांगितले की, धोनीने त्याचे ‘चिकू’ हे नाव प्रसिद्ध केले आहे.

चहलने काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या एका व्हिडिओमध्ये संघाच्या बसमध्ये एक रिकामी जागा दाखवली होती. खरंतर ती जागा धोनीची होती. चहल म्हणाला होता की, “ही जागा, दिग्गज खेळाडू माही भाईची होती. परंतु आताही या जागेवर कोणीच बसत नाही. आम्हाला धोनीची खूप आठवण येत आहे.”

धोनी आयपीएलच्या १३ व्या मोसमाची तयारी करण्यासाठी चेन्नईला गेला होता. सुरेश रैनाने (Suresh Raina) सांगितल्याप्रमाणे, “तो बॅटने चांगली कामगिरी करत होता. तसेच नवीन-नवीन शॉट्सही मारत होता.”

चहल आणि कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) यशामागे धोनीचे मोठे योगदान असल्याचे दिसते. कुलदीपनेही नुकतेच सांगितले होते की, “माही भाई असल्यामुळे माझे ५० टक्के काम पूर्ण होत होते. तो क्षेत्ररक्षकांना योग्य जागेवर उभे करत होता.”

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) मागील ९ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. तो आयपीएल २०२०च्या १३ व्या हंगामातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-डीआरएस सिस्टीम तेव्हा असती तर भारताच्या या गोलंदाजाने घेतल्या असत्या ९०० विकेट्स

-भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटचा ब्रॅडमन

-एकही परदेशी खेळाडूचा समावेश न करता अशी बनु शकते सीएसकेची दमदार टीम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---