भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याला आगामी टी२० विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात संधी मिळाली नाही. संघात चहलचे नाव नसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य वाटले, यामध्ये बऱ्याचशा दिग्गजांचाही समावेश होता. मागच्या काही काळापासून चहल त्याच्या खराब फार्मशी झगडत आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्याला संघात स्थान दिले गेले नाही व त्याच्या जागेवर राहुल चाहरला संधी देण्यात आली.
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातही चहल विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करताना दिसला होता. तसेच श्रीलंका दौऱ्यावर असताना कोरोनामुळे त्याला केवळ एकच टी२० सामना खेळता आला होता. अशात चहलने आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना पत्नी धनश्रीने खराब काळात प्रोत्साहन दिल्याचे सांगितले आहे.
चहलने आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की, “खराब फॉर्म माझ्या डोक्यात फिरत होता, खासकरून आयपीएल नंतर. मग मी माझी पत्नी धनश्रीसोबत वेळ घालवला, जिने माझी खूप मदत केली. तिने मला सांगितले की, मी दररोज विकेट्स घेऊ शकत नाही आणि हा केवळ एक वाईट काळ आहे.”
चहल म्हणाला की जेव्हा तुम्हाला विकेट्स मिळत नाहीत तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या प्रदर्शनावर होतो. तो म्हणाला, “मला माहित आहे की, मी चांगली गोलंदाजी करत होतो. मात्र, टी२० क्रिकेटमध्ये जेव्हा फलंदाज तुमच्या विरोधात आक्रमक शाॅट खेळत नाही. तेव्हा विकेट मिळवणे अवघड होते. तुमच्याकडून जेव्हा विकेट्स मिळत नाहीत, तेव्हा हे प्रदर्शनावर परिणाम करते.” चहलने बोलताना आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना सर्वात अडचण केएल राहुलसमोर येते असाही खुलासा केला.
चहलचे यावर्षी आयपीएलच्या पहिल्या पर्वातील प्रदर्शन खराब राहिले आहे. त्याने ७ सामन्यात केवळ ४ विकेट्स मिळवल्या आहेत. असे असले तरीही तो यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून आयोजित आयपीएलचे उर्वरित सामन्यात चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा मिळणार स्प्लीट कॅप्टन्स? कोणी केली होती याची सुरुवात? वाचा सविस्तर
मंकडिंग क्विन…! पदार्पणाच्या सामन्यात १६ वर्षीय क्रिकेटरने मंकडिंग पद्धतीने ४ फलंदाजांना धाडले तंबूत






