भारतीय क्रिकेट पुरूष संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला टी20 सामन्याने सुरूवात झाली. ज्यातील दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) खेळला गेला. ज्यामध्ये भारत 65 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सॅंडविच तीन खेळाडू खाताना दिसत आहेत.
माउंट मौनेगुईच्या बे ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पुन्हा एकदा पावसाने व्यत्यत आणला होता. तेव्हा कॅमेरामनने भारताच्या ड्रेसिंग रुमकडे फोकस केला, ज्यामध्ये युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) उभ्याने सॅंडविच खाताना आणि संघसहकाऱ्यांसोबत बोलताना दिसत आहे. तेव्हाच शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) येथे येतो आणि चहलच्या हातातील सॅंडविच खातो. एवढेच नाहीतर जवळच उभ्या असलेल्या मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यानेही तोच सॅंडविच खाल्ला. यावरून खेळाडूंमध्ये खेळीमेळीचे वातावरण स्पष्टपणे दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लाईक केला जात आहे. या गोष्टीवरून खेळाडूंमध्ये हास्य-विनोदाबरोबरच परस्परांवरचे प्रेम, आदर आणि बंधुत्वाचे बंध किती घट्ट आहेत हे स्पष्ट होते.
दुसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 20 षठकात 6 विकेट्स गमावत 191 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघाने काही अंतराने विकेट गमावल्या. ज्यामुळे न्यूझीलंड 18.5 षटकात 126 धावसंख्येवरच गारद झाला. त्यांच्याकडून कर्णधार केन विल्यमसन याने अधिक अशा 61 धावा केल्या.
pic.twitter.com/M1LnOmkneU #INDvsNZ #TeamIndia
— Shivam Rajvanshi (@social_timepass) November 20, 2022
या सामन्यात भारताकडून चहल आणि दीपक हुडा यांनी गोलंदाजीत उत्तम पुनरागमन केले. चहलने 4 षटकात 26 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे, कारण त्याला टी20 विश्वचषक 2022च्या एकाही सामन्यात संधी दिली नाही.
हुडाने देखील टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्याने 2.5 षटकात 10 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या.
या मालिकेतील तिसरा आणि मालिका निर्णायक सामना मंगळवारी (22 नोव्हेंबर) नेपियरमध्ये खेळला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. Yuzvendra Chahal, Shardul Thakur & Mohammed Siraj Sandwich Video Viral
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 15 चेंडूत विजय, केनिया संघाकडून टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये नव्या विक्रमाची नोंद
डेविड वॉर्नर लवकरच दिसणार कॅप्टनच्या भुमिकेत! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तयार केला मार्ग