सध्या भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील टी20 मालिकेतील दुसरा सामना माऊंट मॉन्गुई येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत 65 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या युझवेद्र चहल याने पुन्हा एकदा आपण भारताचे सध्या सर्वोत्तम फिरकीपटू असल्याचे दाखवून दिले.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या नाबाद शतकाच्या जोरावर 6 बाद 191 अशी मजल मारलेली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी देखील न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. टी20 विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या लेगस्पिनर युझवेंद्र चहलने या सामन्यात दमदार गोलंदाजी करून दाखवली. त्याने आपल्या चार षटकात केवळ 26 धावा देत ग्लेन फिलिप्स व जिमी निशाम यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवले.
टी20 विश्वचषकात चहलची निवड झालेली. मात्र, कर्णधार रोहित शर्मा याने एकाही सामन्यात त्याला संधी दिली नाही. त्याऐवजी रविचंद्रन अश्विन व अक्षर पटेल हे दोन फिरकी गोलंदाज संपूर्ण विश्वचषकात खेळताना दिसून आले. या दोघांना नेदरलँड्स व झिम्बाब्वे या दुबळ्या संघांना वगळता इतर मोठ्या संघांविरुद्ध केवळ एक बळी मिळवता आला.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संघाने प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर खराब सुरुवात केली. इशान किशनने 36 धावांचे योगदान दिले. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार यादवने एकहाती न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपले दुसरे आंतरराष्ट्रीय टी20 शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ सपशेल अपयशी ठरला. कर्णधार केन विलियम्सन हाच केवळ न्यूझीलंडसाठी अर्धशतक झळकावू शकला. भारतासाठी दीपक हुडाने सर्वाधिक चार बळी मिळवले.
(Yuzvendra Chahal show his class against Newzealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संजूबाबत अश्विनची भविष्यवाणी ठरली खरी! भारताकडून पंतच्या आधी टी20 पदार्पण करूनसुद्धा दुर्लक्षित
रोहित- विराटच्या ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत पंतही बसला मांडी घालून, बनला दुसराच खेळाडू