टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन हा लेगस्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत थिरकताना दिसत आहे. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने त्यांचा भांगडा करतानाचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये शिखर धवन आणि युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा दोघेही भांगडा करताना दिसत असून चाहते या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना धनश्री वर्मा यांनी लिहिले की, “गब्बरच्या स्टाईलमध्ये भांगडा.” त्यांच्या या व्हिडिओने इन्स्टाग्राम रीलवरती आग लावली आहे.
https://www.instagram.com/p/CNErmHBJodY/?utm_source=ig_web_button_share_sheet
युजवेंद्र चहल यांची पत्नी धनश्री वर्मा ही व्यवसायाने दंतचिकित्सक आहे. तसेच ती नृत्यदिग्दर्शक आणि युट्यूबरदेखील आहे.
धनश्री वर्मा हिचे यूट्यूबवर एक डान्स चॅनेल आहे. या चॅनेलचे दीड कोटीहूनही अधिक सबस्काइबर्स आहेत. तसेच ती बॉलिवूडमधील गाणीही पुणनिर्मित करते. याशिवाय ती हिप-हॉप या डान्सचे प्रशिक्षणही देते. तसेच ती तिच्या डान्स अॅकॅडमीचे व्हिडिओही यूट्यूब वाहिनीवर अपलोड करत असते. धनश्रीने 2014 मध्ये नवी मुंबई येथील डीवाय पाटील डेंटल या कॉलेज मधून शिक्षण घेतले आहे.
तर क्रिकेटपटू शिखर धवन हा भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १४२ वनडे सामन्यात ५९७७ धावा केल्या आहेत. तर ६४ टी२० सामन्यात १६७३ धावा आणि ३४ कसोटी सामन्यात २३१५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्या’ फटकेबाजीला पाहून मला माझ्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली; सेहवागने केली स्तुती
‘चाळीस वर्षांचा झालोय, पण स्वत:ला सिद्ध करुन दाखवायची गरज…,’ भज्जीचे टिकाकारांना जबरदस्त प्रत्युत्तर
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत अनुभवी अमित मिश्रा बजावणार ‘ही’ मोठी भूमिका






