भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माला क्रिकेटमध्ये रस असल्याचे आपल्याला अनेक वेळा दिसून आले आहे. धनश्री भारतीय संघाच्या आणि आयपीएलमध्ये आरसीबी संघाच्या सामन्यांदरम्यान अनेक वेळा स्टेडियमवर दिसून येते. भारताचा दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर युजवेंद्र चहलची देखील निवड झाली आहे. त्याचबरोबर संघातील सर्व खेळाडू आपल्या परिवारासोबत श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. चहल देखील पत्नी धनश्री वर्मासोबत श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे सध्या ती चहलसोबत मुंबईमध्ये क्वारंटाईन आहे. श्रीलंका दौऱ्यावरील मालिका 13 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंत खेळली जाणार आहे. या भारतीय संघासोबत प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहून द्रविड देखील जाणार आहेृ. त्यामुळे राहुल द्रविड देखील मुंबईमध्ये क्वारंटाइन आहे. (Indian team spinner’s wife shares photo with Virat and Anushka, appreciates Anushka)
धनश्रीने केले अनुष्काचे कौतुक
धनश्री वर्माने भारतीय संघाचा आणि आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचे खूप कौतुक केले आहे. जेव्हा एका चाहत्याने इंस्टाग्रामवर अनुष्काबद्दल धनश्रीला विचारले, तेव्हा धनश्री म्हणाली की, “ती खूप प्रेमळ आहे आणि चांगली व्यक्ती आहे.” इतकेच नव्हे, तर विराट आणि अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करून तिने त्यांचे कौतुक केले आहे.
Mr Virat Kohli Anushka Sharma and Dhanashree Verma and Yuzi Chahal selfie click picture on Virat Kohli's birthday party time.!! What a picture this is❤️!! @imVkohli pic.twitter.com/bwjkDQORBj
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 5, 2020
यापूर्वीही धनश्रीने विराटबद्दल देखील मन जिंकणारे वक्तव्य केले होते. ती म्हणाली होती की, “विराट खूप विनोदी व्यक्ती आहेत आणि त्यांच्यासोबत नेहमी चांगला वेळ जातो.”
लवकरच चहल करणार मैदानावर पुनरागमन
चहल जुलैमध्ये मैदानावर पुनरागमन करणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघाला या दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामने आणि 3 टी- 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.
धनश्री आहे प्रसिद्ध कोरिओग्राफर
धनश्री वर्मा एक प्रोफेशनल डान्सर तर आहेच. त्याचबरोबर ती कोरिओग्राफर आणि यूट्यूबरसुद्धा आहे. धनश्री अनेकदा तिचे व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करते. जे चाहत्यांनाही खूप आवडते. धनश्रीच्या इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. याशिवाय धनश्री वर्मा एक दंतचिकित्सक आहे. 2014 मध्ये तिने डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली होती.
महत्वाच्या बातम्या
WTC Final: कोहली अन् शास्त्रींची प्लेइंग इलेव्हनची निवड फसली? साउथम्पटनची खेळपट्टी करतेय इशारा
नादच खुळा! अश्विन- जडेजाची जोडी बनेल भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र, ३५ कसोटीत घेतल्यात ३६२ विकेट्स
भारत-न्यूझीलंड फायनलवर संकटाचे ‘काळे ढग’, पहिल्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होण्याचे संकेत