भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. शुक्रवारी (२७ मे) आयपीएल दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. हा सामना युजवेंद्र चहलचा संघ राजस्थानने जिंकला. सामना संपल्यानंतर चहलची पत्नी धनश्री वर्माने स्टेडियमध्ये एक व्हिडिओ शूट केला आणि तो स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर देखील केला.
युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची धनश्री वर्मा (Dhanashree Varma) एक प्रोफेशनल डान्सर आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते. नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना पाहायला मिळत असतात. शुक्रवारी राजस्थान रॉयल्स अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर देखील तिने एका व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ती “जिगल जिगल” या इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चाहते यावर लाईक्स आणि वेगवगळ्या कमेंट्स करत आहेत.
व्हिडिओ शेअर करताना धनश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जिगलिंग फायनल.” चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर पाहायला मिळत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “दिदी डान्स करता-करता एखादा चेंडू येऊन डोक्यात लागायला नको.” तर एका गुजरात टायटन्सच्या चाहत्याने असेल लिहिले की, “आम्ही हा डान्स अंतिम सामना जिंकल्यानंतर करणार आहोत.”
View this post on Instagram
दरम्यान, राजस्थान रॉयल्स साखळी फेरी संपल्यानंतर गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता आणि याच कारणास्तव त्यांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन संधी मिळाल्या. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानला पराभूत केले आणि अंतिम सामना गाठला. त्यानंतर राजस्थानने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आरसीबीचा सामना केला आणि विजय मिळवून अतिंम सामन्यात स्थान पक्के केले. आता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना रविवारी (२९ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. उभय संघातील हा सामना रात्री आठ वाजता सुरू होईल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IPL फायनलच्या तिकीटाचे दर पाहून म्हणाल आपला टीव्हीच बरा
IPL च्या समारोपाची जंगी तयारी; मोदी, शहांच्या उपस्थितीत ‘हे’ सेलिब्रेटी करणार परफॉर्मन्स
IPL फायनलमध्ये राजस्थानसाठी बटलरची फलंदाजीच नाही, तर ‘या’ ५ गोष्टीही ठरू शकतात जमेची बाजू