भारताचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलचे बुद्धिबळ प्रेम जगजाहीर आहे. लहानपणी चहलने व्यावसायिक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये देखील तो सहभागी झाला होता. जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र त्यानंतर क्रिकेटकडे वळल्यामुळे त्याला बुद्धिबळ सोडावे लागले.
मात्र आता तो पुन्हा एकदा बुद्धिबळ खेळतांना चाहत्यांना दिसून येणार आहे. आणि ते सुद्धा कुठल्या साधारण खेळाडूशी नव्हे तर चक्क बुद्धिबळातील विश्वविजेत्या खेळाडूशी तो हा बुद्धिबळाचा डाव रंगणार आहे. हा विश्वविजेता खेळाडू म्हणजे विश्वनाथन आनंद. येत्या १३ जूनला हा सामना खेळवला जाईल.
चहलनेच दिली माहिती
युझवेंद्र चहलने स्वतःच ही माहिती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांना दिली. चहलने त्याची पत्नी धनश्री वर्माने शेअर केलेल्या बातमीचा फोटो आपल्या अकाऊंटवर शेअर केला, ज्यात सदर सामन्यबाबत माहिती देण्यात आली होती. यानुसार येत्या १३ जूनला भारतात हा बुद्धिबळाचा प्रदर्शनीय सामना आयोजित होणार आहे. यात विश्वनाथन आनंद विरूद्ध केवळ चहलच नव्हे तर रितेश देशमुख, आमिर खान, अरजित सिंग, अनन्या बिर्ला आणि मनु कुमार जैन हे इतर काही सेलिब्रिटी देखील हा प्रदर्शनीय सामना खेळतील. विशेष म्हणजे हे सामने कोरोना विषाणू विरोधातील लढाईसाठी निधी उभारण्यासाठी खेळवले जाणार आहेत.
चहलची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड
दरम्यान, भारताचा हा फिरकीपटू शेवटचा आयपीएलच्या चौदाव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाकडून खेळतांना दिसला होता. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा हंगाम मध्यातच स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर चहल क्रिकेटपासून दूर होता. मात्र आता पुन्हा एकदा तो लवकरच क्रिकेटच्या मैदानावर खेळतांना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. येत्या जुलै महिन्यात श्रीलंका दौर्यावर जाणार्या भारतीय संघात त्याची निवड झाली आहे. त्यामुळे या दौर्याद्वारे मैदानावर झोकात पुनरागमन करण्यासाठी तो सज्ज असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
WIvSA: क्विंटन डी कॉकचे वादळी शतक, दक्षिण आफ्रिका दुसर्या दिवसाखेर मजबूत स्थितीत
Video: पाकिस्तानी गोलंदाजाचा सामना करताना आंद्रे रसल जखमी; स्ट्रेचरवरुन न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये
अरे बापरे! श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघ राहणार तब्बल इतके दिवस क्वारंटाईन