मुंबई इंडियन्सचा संघ आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाशी दोन हात करेल. परवा (२९ एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबईने राजस्थान रॉयल्सला पराभूत केले होते. या सामन्याला एक दिवस उलटत नाही तोच त्यांना पुढील सामना खेळायचा आहे.
मात्र मागील सामन्यातील विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. चेन्नईच्या मैदानात खेळलेल्या ५ सामन्यात त्यांना केवळ दोन विजय मिळवता आले होते. मात्र दिल्लीतील पहिलाच सामना जिंकत त्यांनी झोकात सुरुवात केली. हाच सिलसिला त्यांनी कायम राखावा यासाठी मुंबईचा प्रशिक्षक जहीर खानने संघाला एक खास संदेश दिला आहे.
मुंबई इंडियन्सने शेअर केला व्हिडिओ
राजस्थान रॉयल्स विरूद्ध परवा खेळवल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने वर्चस्वपूर्ण खेळ केला. पहिल्या डावात गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे त्यांनी राजस्थानात २० षटकांत १७१ धावांवर रोखले. तर दुसर्या डावात क्विंटन डी कॉकच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर हे लक्ष्य सहज गाठले. यासह यंदाच्या हंगामातील तिसरा विजय त्यांनी नोंदवला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक जहीर खानने ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना खास संदेश दिला. ज्याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.
या व्हिडिओत जहीर खान म्हणाला, “माझ्या मते या सामन्यात आपण उत्तम खेळ केला. आगामी सामन्यांसाठी आपल्याला अनेक सकारात्मक गोष्टी सापडल्या आहेत. सगळ्यांनी त्याचा विचार करा. त्यासोबतच आपण पुढे जाऊ. तसेच केवळ एका दिवसाच्या अंतराने आपल्याला पुढील सामना खेळायचा आहे. त्यामुळे रिकव्हरीवर लक्ष द्या. जेव्हा गरज आहे तेव्हाच खेळाचा विचार करा, अन्यथा करू नका. आपण याच पद्धतीने इथून पुढेही काम करत राहू. सकारात्मक राहू. आपल्याला ते कायम फायदेशीर ठरले आहे. आपण ज्या पद्धतीने काम करतो, ते अचूक असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे आपण त्याच पद्धतीने काम करत राहू.”
???????? ???????????????? ???????????????????????????????????? ????@ImZaheer addresses the team after our victory against the Royals! ????#OneFamily #MumbaiIndians #MI #MIvRR #IPL2021 pic.twitter.com/1ci2NeAJFR
— Mumbai Indians (@mipaltan) April 30, 2021
चेन्नईला भिडणार मुंबईची पलटण
दरम्यान, आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्जशी दोन हात करेल. यापूर्वी आयपीएल इतिहासात मुंबई चेन्नईवर वरचढ ठरली आहे. मात्र यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ देखील तुफान फॉर्मात आहे. त्यांचा विजयरथ रोखणे, मुंबईसाठी आव्हानात्मक असेल. मात्र यामुळे रंगतदार लढतीची चाहत्यांना अपेक्षा असेल.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! डेव्हिड वॉर्नर हैदराबादच्या कर्णधारपदावरुन पायउतार, विलियम्सन नवा कर्णधार
महाराष्ट्र दिन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे महाराष्ट्रीयन फलंदाज






