---Advertisement---

सागरिकाबरोबर लग्न होण्यापूर्वी ‘या’ अभिनेत्रीसोबत झहीर खानचे तब्बल 7 वर्षे होते प्रेमसंबंध!

On: शनिवार, ऑक्टोबर 7, 2023 10:05 AM
---Advertisement---

भारतीय संघाचे असे अनेक खेळाडू असतात, ज्यांचे प्रेम प्रकरण खूपच चर्चेत असतात. अनेक भारतीय संघातील अनेक खेळाडूंची नावे अभिनेत्रींशी जोडली गेली आहेत. काहींनी प्रेमाचे रुपांतर लग्नात केले, तर काहींचे प्रेम अर्ध्यातच राहिले. मागील काही दिवसांपासून खेळाडूंच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो आणि त्यांच्ये चर्चेने प्रसार माध्यमावर धुमाकूळ घातलेला आहे. अशा आणखी एका भारतीय खेळाडूबद्दल चर्चा होत आहे. तो म्हणजे शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) आपला 45वा वाढदिवस साजरा करत असलेल्या माजी वेगवान गोलंदाज झहीर खान.

झहीर खानचे सागरिका घाटगे सोबत झाले लग्न
जागतिक क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजी करणाऱ्यांच्या दिग्गजांच्या यादीत झहीर खान (Zaheer Khan) याचाही समावेश आहे. झहीर खानने 2017 साली अभिनेत्री सागरिका घाटगेला आपली अर्धांगिनी बनवले. ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेल्या सागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी 23 नोव्हेंबर 2017 रोजी विवाह केला. त्यानंतर दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येते.

https://www.instagram.com/p/B5NTwPZBNmx/

लग्नाअगोदर ईशा शरवाणी सोबत होते संबंध!
असे म्हटले जाते की, सागरिका घाटगे सोबत लग्न करण्यापूर्वी झहीर खानचे लग्नाच्या अगोदर एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध होते, जे काही वर्षे अगोदर तूटले. तिचे नाव ईशा शरवाणी. त्या दोघांना खूप वेळा एकत्र पाहण्यात आले होते. इतकेच नव्हे तर ते तिच्या सोबत ‘लिव्ह इन रिलेशन’ मध्ये राहत होते. बॉलीवूड चित्रपट ‘किसना’ त्यातून प्रेक्षकांसमोर आलेली ईशा शरवाणी आणि झहीर खान यांचे सात वर्ष संबंध होते.

https://www.instagram.com/p/B0qOO2apCeP/

सात वर्ष नात्यानंतर दोघेही झाले वेगळे
प्रसारमाध्यमाच्या माहितीनुसार, ईशा शरवाणी आणि झहीर खान पहिल्यांदा 2005मध्ये एका कार्यक्रमात भेटले. त्यानंतर दोघांमध्ये ओळख वाढली आणि बघता बघता दोघेही एकमेकांमध्ये गुंतून गेले आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर झहीर आणि ईशा यांना खूप वेळा एकत्र पाहण्यात आले.

असे म्हटले जाते की, दोघांनी एकमेकांना लग्नाची मागणी घातली आणि त्याने लग्नाची तयारी देखील सुरू केली होती. लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आपले नाते प्रसार माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले. परंतु अचानक 2011 मध्ये दोघेही वेगळे झाले. 2011च्या विश्वचषक सामन्याच्या अगोदर त्यांचे नातेसंबंध तुटले होते.

ईशा सोबतच्या वेगळे होण्याबाबत झहीर खानने कधीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु ईशाने यावर बोलताना म्हणाले की, “मी आता पण झहीर खानला आपला मित्र मानते आणि आम्ही नेहमी मित्र बनून राहू.”

झहीर खानच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून कारकीर्दीत 92 कसोटी, 200 वनडे आणि 17 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले. कसोटीत त्याने 311, वनडेत 282 आणि टी20त 17 विकेट्सची नोंद आहे.

हेही वाचा-
गोष्ट एका क्रिकेटरची: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
भारताने चीनमध्ये घडवला इतिहास! महिला कबड्डीने देशाला मिळवून दिले 100वे पदक, 25 गोल्ड खिशात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---