---Advertisement---

सागरिका घाटगेपूर्वी या बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत होता झहीर खान, 8 वर्ष टिकलं होतं नातं

On: सोमवार, ऑक्टोबर 7, 2024 3:05 PM
---Advertisement---

भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान आज (7 ऑक्टोबर) आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. झहीर खाननं 2000 ते 2014 दरम्यान भारतासाठी 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तो भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो.

झहीरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत लग्न केलं आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सागरिकाच्या आधीही झहीर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत होता. या दोघांचं नातं जवळपास आठ वर्ष टिकलं होतं. मात्र एवढ्या कालावधीनंतरही हे नातं संपुष्टात आलं. या बातमीत आम्ही तुम्हाला या दोघांच्या प्रेमाच्या न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा शरवानी जवळपास 8 वर्ष एकमेकांना डेट करत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते 2005 मध्ये एका कार्यक्रमात भेटले होते. पहिल्या भेटीनंतर दोघांत चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांची जवळीकही वाढली. त्यावेळी झहीर भारताच्या महत्त्वाच्या गोलंदाजांपैकी एक होता, तर ईशानंही तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. भारताच्या सामन्यादरम्यान ईशाला अनेकदा स्टेडियममध्येही स्पॉट करण्यात आलं होतं. झहीरला चिअर करण्यासाठी ती अनेकदा मैदानात पोहोचली होती.

बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी परस्पर संमतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आपलं नातं अधिकृत केलं. रिपोर्ट्सनुसार त्यांच्या लग्नाची बातमीही समोर आली होती. 2011 विश्वचषकादरम्यान त्यांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक झहीर आणि ईशानं त्यांचं आठ वर्षांचं नातं संपुष्टात आल्याची घोषणा केली. 2012 मध्ये एका मुलाखतीदरम्यान ईशानं विभक्त झाल्याची पुष्टी केली. मात्र या दोघांचं नातं अचानक का संपलं हे आजतागायत कळू शकलेलं नाही. ईशापासून वेगळं झाल्यानंतर झहीर खाननं नोव्हेंबर 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत लग्न केलं.

हेही वाचा – 

“भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येणार”, पीसीबी अध्यक्षांचा धक्कादायक दावा!
श्रीलंकेचा हेड कोच बनला हा दिग्गज खेळाडू, भारताविरुद्ध ठोकल्या आहेत भरपूर धावा!
हार्दिक पांड्याचा ‘नो लुक’ शॉट पाहिला का? न बघताच हाणला जबरदस्त चौकार! VIDEO व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---