---Advertisement---

कोहलीवर टीका करण्यापूर्वी तुझे संघातील स्थान पहा, इंग्लंडच्या गोलंदाजावर झहीर कडाडला!

On: शुक्रवार, जुलै 27, 2018 3:52 PM
---Advertisement---

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनने विराट कोहलीवर काही दिवसापूर्वी जोरदार टिका करत विराट खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता.

“विराटने धावा केल्या नाही तर त्याला खरचं काही फरक पडणार नाही का? मला असे वाटते की विराट खोटे बोलत आहे.” असे जेम्स अॅंडरसन विराटवर टिका करत म्हणाला.

त्यानंतर भारताचा माजी गोेलंदाज झहीर खानने जेम्स अॅंडरसनला विराट कोहलीवर टीका केल्याबद्दल चांगलेच धारेवर धरले आहे.

“जेम्स अॅंडरसन अशा वयात आहे ज्यामध्ये त्याला खेळपट्टीच्या जोरावरच यश मिळू शकते. जर अॅंडरसनलला खेळपट्टीची मदत मिळाली नाही तर त्याचा भारतीय फलंदाज चांगलाच समाचार घेतील. त्याचबरोबर त्याला संघातील स्थानही गमवावे लागेल.” या शब्दात झहीरने जेम्स अॅंडरसनवर पलटवार केला.

1 ऑगस्ट पासून सुरु हेणाऱ्या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ जोरदार तयारीली लागले आहेत.

या दौऱ्यातील टी-20 मालिकेत भारताने इंग्लंडला 2-1 ने पराभूत केले. तर एकदिवसीय मालिकेत इंग्लडने भारतावर 2-1 ने विजय मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-त्या गोलंदाजाचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करणे ‘हास्यास्पद’

-टीम इंडियासाठी खुशखबर! दोन महत्त्वाचे गोलंदाज सराव सामन्यात चमकले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment