भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळली जाईल. याआधी या दोन देशात होणाऱ्या कसोटी मालिकेबद्दल अनेक क्रिकेट तज्ञांनी आपले मतं व्यक्त केले आहे. मात्र, आता भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज जहीर खान याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकेबद्दल एक भविष्यवाणी केली आहे.
या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे दिग्गज गोलंदाज भारतीय संघात आहेत, तर मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश आहे.
दोन्ही संघांमध्ये क्रिकेट जगातातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा समावेश असल्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यांचा निकाल गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून असेल असे मत जहीर खान याने व्यक्त केले आहे.
तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकेचा निकाल गोलंदाज ठरवतील- जहीर खान
माजी डावखुरा वेगवान गोलंदाज जहीर खान 2011 मधील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. तो म्हणाला की, “जगभरातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या मालिकेत खेळणार आहे.ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर चेंडू बाउंस होतो आणि वेगाने येतो. त्यामुळे मला वाटते की वनडे, टी20 आणि कसोटी मालिकेचा निकाल गोलंदाज ठरवतील.”
भारतीय संघासाठी असेल अवघड आव्हान
“भारतीय संघाला डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या दिग्गज फलंदाजांचा सामना करावा लागेल, त्यामुळे हे अवघड आव्हान असेल” असेही पुढे बोलताना जहीर खान म्हणाला.
सन 2018-19 मध्ये भारताने जिंकली होती कसोटी मालिका
वॉर्नर आणि स्मिथ संघात नसताना भारताने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाला 2-1 ने मात दिली होती. बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोन्ही खेळाडूंना एक वर्षासाठी बंदी घातली गेली होती.
….कोणताही संघ प्रबळ दावेदार नाही
मालिकेच्या निकालाबद्दल बोलताना जहीर म्हणाला की, “या मालिकेत कोणताही संघ प्रबळ दावेदार नाही कारण दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांचा भरणा आहे. याच कारणामुळे चाहाते आगामी मालिका पाहण्यासाठी उत्साहीत आहे.”
वनडे मालिकेला 27 नोव्हेंबरपासून होईल सुरुवात
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 27 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरूवात होईल. वनडे मालिकेनंतर दोन्ही संघ 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर 4 कसोटी सामन्यांची खेळली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं! ‘या’ मैदानावर होणार ऑस्ट्रेलिया – भारत पहिला कसोटी सामना
ऑस्ट्रेलिया-भारत मालिकेची आतुरता शिगेला! केवळ एका दिवसात संपली ‘या’ सामन्यांची तिकीटे
लॉकडाऊननंतर भारतात आयोजित पहिल्याच क्रिकेट स्पर्धेला कोरोनाचं ग्रहण; पुन्हा २ क्रिकेटपटू पॉझिटीव्ह