भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या टी२० सामन्यांत भारतीली पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर अनेकांनी कर्णधार रिषभ पंतवर ताशेरे ओढायला सुरुवात केली. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनीही रिषभ पंतच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यामध्ये भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान याने देखील रिषभला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली आहे.
झहीर खान (Zaheer Khan) म्हणाला की, “युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) षटकांचा नक्कीच पुरेपूर वापर न करणे ही एक गोष्ट आहे ज्यावर रिषभ पंतला (Rishabh Pant) लक्ष केंद्रित करावे लागेल आणि संघ व्यवस्थापन देखील त्याच्याशी याबद्दल बोलेल. चहलला कठीण काळात पुनरागमन करताना आपण अनेकदा पाहिले आहे. त्याच्याकडे पुनरागमन करून संघाला यश मिळवून देण्याची क्षमता आहे. सामना जिंकण्यासाठी आफ्रिकेच्या फलंदाजांना बाद करणे गरजेचे होते. से असू शकते की अक्षर पटेलच्या (Axar Patel) शेवटच्या षटकाने पंतला असे सूचित केले असेल की सध्या फिरकी गोलंदाज हा पर्याय नाही परंतू चहलकडे त्याच्यापेक्षा अधिक क्षमता आहे.”
याशिवाय झहीरने भारतीय गोलंदाजांनाही आपल्या निशाण्यावर घेत म्हटले की, “दक्षिण आफ्रिकेला (South Africa) १० षटकात १२.५० च्या धावगतीने धावा करायच्या होत्या. तो आणखी वाढेल अशी आमची अपेक्षा होती कारण जेव्हा धावगती १४-१५ पर्यंत पोहोचते तेव्हा विकेट्स गुच्छांमध्ये येतात आणि फलंदाजावर दबाव वाढतो. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांना त्यात अपयश आले.”
दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इशान किशनने (Ishan Kishan) भारतीय संघाकडून सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) २३ धावांचे योगदान दिले. भारताने दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी २१२ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, भारतीय गोलंदाज या लक्ष्याचा बचाव करण्यात अपयशी ठरले. आफ्रिकन संघाने हे लक्ष्य ३ गडी गमावून सहजपणे पूर्ण केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारताने सामना गमावला तरीही केला मोठा विक्रम
आयसीसीने बुमराहला घातलीय मानाची ‘टोपी’, पण का केला गेलाय ‘बूम बूम’चा सन्मान?
मुरलीधरन, वॉर्नची बरोबरी करण्यापासून अँडरसन फक्त ३ विकेट्स दूर, याच मालिकेत इतिहास घडवण्याची संधी