---Advertisement---

‘भारतीय क्रिकेटची ही नवीन सुरुवात, संपूर्ण लक्ष रोहित शर्मा आणि राहुल द्रविडवर’, माजी भारतीय क्रिकेटरचे व्यक्तव्य

On: मंगळवार, नोव्हेंबर 16, 2021 3:41 PM
---Advertisement---

यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने अप्रतिम कामगिरी करत जेतेपद आपल्या नावावर केले. आता १७ नोव्हेंबर पासून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेपासून भारतीय टी२० संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे असणार आहे, तर संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड सांभळणार आहेत. दरम्यान, ही मालिका सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय गोलंदाज झहीर खानने मोठे वक्तव्य केले आहे.

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा ही रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा होतो. तसेच विराट कोहलीने देखील स्पर्धा झाल्यानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे म्हटले होते. आता टी२०मध्ये राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांची जोडी पाहायला मिळणार आहे. या जोडीबाबत बोलताना झहीर खानने म्हटले आहे की, ‘सर्वांचे लक्ष याच गोष्टीकडे लागून असेल की, नवा कर्णधार आणि प्रशिक्षक कशी कामगिरी करतो.’

क्रिकबजवर भारत विरुद्ध न्यूझीलंड या टी२० मालिकेबाबत बोलताना झहीर खानने म्हटले की, “भारतीय संघाला टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नव्हते, त्यामुळे निश्चितच ते निराश असतील. या मालिकेत या सर्व गोष्टी सुरू असतील. खरं तर ही एक भारतीय क्रिकेटची नवीन सुरुवात आहे. संपूर्ण लक्ष रोहित शर्मा आणि राहुल द्रविडवर केंद्रित असणार आहे. तसेच भारतीय संघाची रणनिती काय असेल हे ही महत्वाचे असेल.”

रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पहिल्याच मालिकेसाठी ते जयपूरला पोहोचले आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये १७ नोव्हेंबर रोजी पहिला जयपूरला टी २० सामना पार पडणार आहे.

न्यूझीलंड संघाविरुद्धच्या टी -२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

महत्त्वाच्या बातम्या – 

‘या’ दिवशी २०२२ टी२० विश्वचषकाला होणार सुरुवात; ऑस्ट्रेलियातील सात शहरात आयोजन, आयसीसीची घोषणा

“मी कायद्याचे पालन करतो”, ५ कोटींची घड्याळं जप्त झाल्याच्या बातमीवर हार्दिक पंड्याने सोडले मौन

टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या बाबर आझमऐवजी डेविड वॉर्नरला मालिकावीर का निवडले? वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---