वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आता भारतीय संघाला झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात उभय संघांना ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेची सुरुवात १८ ऑगस्टला होईल. तर अखेरचा सामना २२ ऑगस्टला होईल. यापूर्वी भारत २०१६ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने वनडे मालिकेत ३-० ने झिम्बाब्वेला पराभूत केले होते. अशात आता पुन्हा एकदा झिम्बाब्वेत आपला दबदबा दाखवण्याची संधी भारताकडे असेल. तत्पूर्वी या दौऱ्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया…
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वेळापत्रक
भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका १८ ऑगस्ट रोजी सुरु होईल. तर मालिकेतील दुसरा सामना २० ऑगस्टला आणि तिसरा सामना २२ ऑगस्टला खेळला जाईल. हे तिन्ही सामने हरारेरीत हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळले जातील. तसेच भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.४५ वाजता या सामन्यांना सुरुवात होईल. तत्पूर्वी ३० मिनिट आधी १२.१४ ला सामन्यासाठी नाणेफेक होईल.
१८ ऑगस्ट (गुरुवार), झिम्बाब्वे विरुद्ध भारत, पहिली वनडे, हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे दुपारी १२:४५वा.
२० ऑगस्ट (शनिवार), झिम्बाब्वे विरुद्ध भारत, दुसरी वनडे, हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे दुपारी १२:४५वा.
२२ ऑगस्ट (सोमवार), झिम्बाब्वे विरुद्ध भारत, तिसरी वनडे, हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे दुपारी १२:४५वा.
All set for #ZIMvIND ODI series 🙌
Action starts tomorrow 💪#TeamIndia pic.twitter.com/MJoZgpp81J
— BCCI (@BCCI) August 17, 2022
वनडे मालिकेचे लाईव्ह प्रसारण
झिम्बाब्वे आणि भारतीय संघातील वनडे सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सोनी टेन १, टेन ३ या टीव्ही चॅनलवर हे सामने लाईव्ह पाहता येतील. डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्यांचा आनंद लुटता येईल. तसेच मोबाईल आणि लॅपटॉपवरही या सामन्यांचा आनंद घेता येऊ शकतो. सोनी लिव्ह या ऍपवरही हे सामने लाईव्ह दिसतील.
झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल , आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Asia Cup| ‘रोहित आणि टीम’ला द्यावी लागणार फिटनेस टेस्ट, ‘या’ दिवशी दुबईसाठी भरतील उड्डाण
फिरकीपटूंसाठी मोठी बाधा आहे ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू, आशिया चषकात संधी देण्याची होतीये मागणी
व्वा पांडेजी! भारतीय संघातून बाहेर असलेल्या मनिषचा टी२० लीगमध्ये कहर, ठोकले झंझावाती अर्धशतक