भारतीय क्रिकेट संघ पुढील काही दिवसात झिम्बाब्वे दौरा करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल. भारतीय संघात या मालिकेसाठी अनेक प्रमुख खेळाडूंना स्थान दिले गेले नाही. यापूर्वी घोषित केलेल्या संघाचा कर्णधार शिखर धवन होता. मात्र, आता त्याच्या जागी केएल राहुल नेतृत्व करेल. झिम्बाब्वेसाठी प्रतिष्ठित असलेल्या या मालिकेसाठी आता यजमानांनीदेखील आपला संघ घोषित केला आहे. रेगीस चकाब्वाच्या नेतृत्वातील हा संघ भारतीय संघाला आव्हान देईल.
झिम्बाब्वे संघाच्या अलीकडच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्ध संघाची एकजुटीची कामगिरी पाहायला मिळाली. अष्टपैलू सिकंदर रझा उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत यावेळीही त्याच्या बॅटमधून धावांची अपेक्षा यजमान संघाला असेल. झिम्बाब्वेच्या संघाने बांगलादेशविरुद्ध टी२० आणि वनडे मालिका आपल्या नावे केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघासमोर आव्हान काहीसे अवघड असेल.
Zimbabwe name squad for ODI series against India
Details 👇https://t.co/cDteJIV5AZ pic.twitter.com/5tm3ecV9e2
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) August 11, 2022
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. यानंतर दुसरा सामना २० आणि शेवटचा सामना २२ ऑगस्ट रोजी होणार होईल. हे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहेत.
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ-
रेगिस चकाब्वा (कर्णधार), तनाका चिवांगा, ब्रॅड इवान्स, ल्यूक जोंगवे, इनोसंट काया, ताकुदजवानाशे कैटानो, क्लाइव मडांडे, वेस्ली मेडवेरे, तदीवानाशे मारुमनी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगा, रिचर्ड एनगारवा, विक्टर न्याउची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरिपानो.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: दुबईचे मैदान अन् रोहित शून्यावर बाद! चाहत्यांच्या कायम लक्षात राहिलेला ‘तो’ सामना
Asia Cup 2022 | पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी विराटने सुरू केला सराव, पाहा व्हिडिओ
Asia Cup 2022 | बुमराहच्या अनुपस्थितीत चमकदार कामगिरी करू शकतात भारताचे ‘हे’ तीन गोलंदाज