आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी सर्वच संघ त्यांचा 15 सदस्यांची घोषणा करत आहेत. गुरुवारी 15 सप्टेंबर रोजी या प्रमुख स्पर्धेसाठी झिम्बाब्वे संघही घोषित झाला आहे. त्यांचा नियमित कर्णधार क्रेग इर्विन याचे विश्वचषकासाठी संघात पुनरागमन झाले आहे. तो मागच्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी खेळला नव्हता. आता विश्वचषक संघात मुजरबानीचेही पुनरागमन झाले आहे. विश्वचषकात झिम्बाब्वेचा पहिला सामना 17 ऑक्टोबर रोजी आयर्लंडविरुद्ध असेल.
टी-20 विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या झिम्बाब्वे संघात तेंदई चतारा, वेलिग्टन मसाकाद्जा आणि मिल्टन शुम्बा यांचे देखील पुनरागमन झाले आहे. चताराला कॉलरबोन फॅक्चर झाल्यामुळे तो संघातून बाहेर होता. शुम्बाच्या खांद्याला दुखापत झाली होती, तर अनुभवी रेजिस चकाबवा, सिंकदर रजा आणि सीन विलियन्स यांच्यासह ब्रॅडली इवांस, टोनी मुनयोंगा आणि क्लाइव मडांडे यांनाही संघात ठेवले गेले आहे. तदीवानाशे मारुमनी, इनोसेंट काया, केविन कसुजा, विक्टर न्याउची आणि तनाका चिवंगा यांना संघात राखीव खेळाडूच्या रुपात घेतले गेले आहे
झिम्बाब्वे संघ टी-20 विश्वचषकात ग्रुप बी मध्ये वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि स्कॉटलंड यांच्यासह आहे. झिम्बाब्वेला विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंका आणि नामिबिया संघासोबत सराव सामने खेळायचे आहेत. विश्वचषकात झिम्बाब्वे पहिला सामना 17 ऑक्टोबर रोजी आयर्लंडविरुद्ध, दुसरा सामना 19 ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला जाईल आणि तिसरा सामना संघाला 21 ऑक्टोबर रोजी स्कॉटलंडविरुद्ध खेळायचा आहे. ग्रुपमध्ये जे संघ पहिल्या दोन क्रमांकांवर राहतील त्यांना सुपर 12 फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर 12 फेरीचे सामने 22 ऑक्टोबर रोजी सुरू होतील. ग्रुप ए मध्ये श्रीलंका, यूएई, नेदरलंड आणि नामिबिया संघ आहेत.
टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला झिम्बाब्वे संघ –
क्रेग इर्विन (कर्णधार), रयान बर्ल, रेजिस चकाबवा, तेंदई चतारा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जोंगवे, क्लाइव मडांडे, वेस्ली मधेवेरे, वेलिंग्टन मसाकाद्जा, टोनी मुनयोंगा, ब्लेसिंग मुजरबानी, रिचर्ड नगारवा, सिकंदर रजा, मिल्टन शुंबा, सीन विलियम्स.
राखीव खेळाडू –
तनाका चिवंगा, इनोसेंट कैया, केविन कसुजा, तदीवानाशे मारुमनी, विक्टर न्याउची.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जला मिळाला विश्वविजेता प्रशिक्षक, आयपीएल ट्रॉफीही केलीये नावावर
पाकिस्तानमध्ये पोहोचताच इंग्लंडने दाखवला मनाचा मोठेपणा, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर
ब्रेकिंग! सॅमसन बनला भारताचा कर्णधार, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मिळाली जबाबदारी