---Advertisement---

झिम्बाब्वे संघाची अविश्वसनीय कामगिरी, अवघ्या १२ चेंडूंमध्ये जिंकला आंतरराष्ट्रीय टी२० सामना

On: रविवार, सप्टेंबर 12, 2021 11:59 AM
---Advertisement---

टी-२० क्रिकेट हा क्रिकेटचे सर्वात जलद स्वरूप आहे. या स्वरूपात फलंदाज चौकार आणि षटकार मारण्याच्या प्रयत्नात असतात. तर दुसरीकडे गोलंदाजांना चांगलाच चोप मिळत असतो. परंतु जेव्हा गोलंदाज चांगल्या लयीत असतात, तेव्हा ते फलंदाजाला नांग्या टाकायला भाग पाडत असतात. असाच काहीसा प्रकार शनिवारी (११ सप्टेंबर) पाहायला मिळाला. ज्यामध्ये गोलंदाजी करत असलेल्या संघाने फलंदाजी करत असलेल्या संघाला अवघ्या १७ धावांवर सर्वबाद केले.

सध्या महिला टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी आफ्रिकन क्षेत्रात पात्रात फेरीतील सामने सुरू आहेत. या दरम्यान अनेक मोठ मोठे विक्रम केले जात आहेत. शनिवारी असाच एक रोमांचक सामना इस्वातिनी आणि झिम्बाब्वे संघांमध्ये पार पडला. या सामन्यात झिम्बाब्वे संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत इस्वातिनी संघाचा संपूर्ण डाव ९.२ षटकात अवघ्या १७ धावांवर संपुष्टात आणला.

सामन्यातील पहिल्याच षटकात बाद केले ३ गडी 
या सामन्यातील पहिल्याच षटकात झिम्बाब्वे संघातील गोलंदाज बोफानाने घातक गोलंदाजी करत इस्वातिनी संघातील ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. हे तिघेही फलंदाज भोपळाही न फोडता माघारी परतले. त्यानंतर इस्वातिनी संघातील फलंदाजांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु पाचव्या षटकातील शेवटच्या २ चेंडूवर बोफानाने पुन्हा एकदा इस्वातिनीच्या २ फलंदाजांना बाद करत माघारी धाडले. यासह अवघ्या १२ धावांवर इस्वातिनी संघाचे ५ फलंदाज माघारी परतले होते.

बोफानाने बाद केले ६ गडी, ७ फलंदाज खातेही न खोलता परतले माघारी 
पुढे डावातील सहाव्या षटकात सिंबाडाने इस्वातिनी संघातील ६ व्या फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पाहता पाहता, अवघ्या ९.२ षटकात इस्वातिनी संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १७ धावांवर कोसळला. झिम्बाब्वे संघाकडून बोफानाने ४ षटकात ११ धावा खर्च करत ६ फलंदाजांना बाद केले. तर लोरीन फिरीने ३ आणि सिबांडाला १ गडी बाद करण्यात यश आले होते.

इस्वातिनी संघाकडून फलंदाजी करताना एकाही फलंदाजाला दुहेरी धावा करता आल्या नाहीत. तसेच ७ खेळाडू तर भोपळा हो न फोडता माघारी परतले. प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाला विजय मिळवण्यासाठी १८ धावांची आवश्यकता होती. हे आव्हान झिम्बाब्वे संघाने एकही गडी बाद होऊ न देता २ षटकातच गाठले आणि सामन्यात विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

थरारक… ‘या’ संघाचा टी२० सामन्यात तब्बल २०० धावांनी विजय, प्रतिस्पर्धींना अवघ्या २८ धावांवर गुंडाळले

अंतिम कसोटी सामना रद्द झाल्यानंतर ईसीबीचे आयसीसीला पत्र, जाणून घ्या काय लिहिले होते त्यात

धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर शास्त्रींना नव्हता विश्वास, कॅप्टनकूलने ‘असे’ पाडले होते तोंडघशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---