ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात पात्रता फेरीचे सर्व सामने शुक्रवारी (21 ऑक्टोबर) समाप्त झाले. पात्रता फेरीच्या अखेरच्या दिवशी ब गटातील दुसरा सामना झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्या दरम्यान खेळला गेला. झिम्बाब्वे संघाने आपला अनुभव या निर्णायक सामन्यात दाखवत 5 गड्यांनी विजय आपल्या नावे केला. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर अनुभवी क्रेग एर्विन व सिकंदरचा यांनी केलेली फलंदाजी झिम्बाब्वेच्या विजयास कारणीभूत ठरली. या विजयासह झिम्बाब्वे संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरला.
Zimbabwe are through to the Super 12 after a fabulous performance in Hobart 👏🏻
The first time they have made it out of the First Round at the #T20WorldCup 🔥#SCOvZIM pic.twitter.com/W1snTvtwch
— ICC (@ICC) October 21, 2022
होबार्ट येथे झालेल्या या सामन्यात जो संघ जिंकणार तो संघ मुख्य फेरीसाठी पात्र होणार होता. दोन्ही संघांनी यापूर्वी आपला एक एक सामना जिंकला होता. निर्णायक सामन्यात स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. परंतु, संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या सलामीवीर जॉर्ज मन्सी व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. मन्सीने शानदार 54 धावांची खेळी केली. मॅकलॉयडने 25 धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेसाठी चटारा व नवागरा यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. परिणामी, स्कॉटलंड संघ निर्धारित 20 षटकात 6 बाद 132 धावा करू शकला.
या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने आपले तीन बळी झटपट गमावले. मात्र, अनुभवी क्रेग एर्विन याने शानदारपणे किल्ला लढवला. अष्टपैलू सिकंदर रझाने मैदानात येताच आक्रमण करत सामना जास्त अटीतटीचा होणार नाही याची काळजी घेतली. त्याने 23 चेंडूंवर 40 धावा केल्या. अखेरीस रेयान बर्ल व शुंबा यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. झिम्बाब्वे मुख्य फेरीत भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश व नेदरलँड्स यांचा सामना करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलामीवीरांनो सावधान! आफ्रिदीच्या यॉर्करने अफगाणिस्तानच्या फलंदाजाला केलंय जखमी, माजी प्रशिक्षक म्हणतोय…
बीसीसीआय अध्यक्ष बनताच रॉजर बिन्नींचे गांगुलीबद्दल मोठे विधान; म्हणाले, ‘त्याने भारतीय क्रिकेटचा…’