झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा टी-२० सामना झिम्बाब्वेच्या एडीनबर्ग मैदानावर पार पडला. या रोमांचक सामन्यात झिम्बाब्वे संघाने स्कॉटलंड संघाला १० धावांनी पराभूत करत विजय मिळवला आहे. यासह टी-२० मालिका १-१ च्या बरोबरीत आणली आहे.
या सामन्यात झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. कारण संघातील सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर सीन विलियम्सने शेवटी येऊन ५२ चेंडूंमध्ये नाबाद ६० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला होता. तर कर्णधार क्रेग एर्विनने देखील ३० धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर झिम्बाब्वे संघाला २० षटकअखेर ५ बाद १३६ धावा करण्यात यश आले होते.
स्कॉटलंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकात अवघ्या १३७ धावांची आवश्यकता होती. परंतु स्कॉटलंड संघातील सलामीवीर फलंदाज संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत. जॉर्ज मुंसी ९ तर कायल कोएटजर अवघ्या २ धावा करत माघारी परतला. खराब सुरुवात मिळाल्यानंतर स्कॉटलंड संघ बॅकफूटवर होता. परंतु बेरींगटनच्या ४२ धावांच्या खेळीमुळे स्कॉटलंड संघाने पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केले होते. तर शेवटी क्रॉसने ४२ आणि लिस्कने २५ धावांची खेळी केली. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे स्कॉटलंड संघाचा संपूर्ण डाव १९.४ षटकात १२६ धावांवर संपुष्टात आला.
सामना शेवटच्या षटकात पालटला. या अंतिम षटकात स्कॉटलंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी १३ धावांची आवश्यकता होती. परंतु षटकातील पहिल्याच चेंडूवर शरीफ २ धावा करत माघारी परतला. त्यानंतर षटकातील दुसऱ्या चेंडूवर वॅट भोपळाही न फोडता धावबाद होऊन माघारी परतला. पुढे षटकातील तिसऱ्या चेंडूवर लिस्क बाद होऊन माघारी परतला. तर चौथ्या चेंडूवर एवंस देखील धावबाद होऊन माघारी परतला.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल २७ शतके ठोकणारा ‘हा’ क्रिकेटर आता विश्वचषकासाठी निवडणार भारतीय संघ
आयपीएल, टी२० विश्वचषक मग दिग्गज क्रिकेटर्ससाठी ‘ही’ नवी लीग; युएईत क्रिकेट स्पर्धांचा भरणार मेळावा
अगग! पाकिस्तानचे इंग्रजीचे वांदे, ‘आम्ही न्यूझीलंडसाठी Fool प्रुफ नियोजन केले’ म्हणत झाले ट्रोल