भारतीय क्रिकेट संघ लवकरच झिम्बाब्बे दौऱ्यावर जाणार असून उभय संघात गुरुवारपासून (१८ ऑगस्ट) ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक डेव ह्यूटन यांनी भारतीय संघाला चेतावणी दिली आहे. झिम्बाब्वेचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यांनी नुकतेच मायदेशात झालेल्या वनडे आणि टी२० मालिकेत बांगलादेशला पराभूत केले आहे. अशात वनडे मालिकेत झिम्बाब्वेकडून भारताला काट्याची टक्कर मिळू शकते.
झिम्बाब्वेच्या (Zimbabwe vs India) संघाचे सध्या वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. त्यांनी दमदार खेळ दाखवत टी२० विश्वचषकासाठी पात्रताही मिळवली आहे. अशात झिम्बाब्वेचा संघ वनडे मालिकेतही (ODI Series) भारतापुढे चांगलेच आव्हान ठेवेल. झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक ह्यूटन (Dave Houghton) भारताला आव्हान देत म्हणाले (Dave Houghton Warned India) की, “आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही भारताला हरवू शकतो. आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तितकेच चांगले आहे, जितके माझ्यावेळी होते. त्यात भर म्हणजे, आमच्याकडे काही फलंदाज आहेत, जे वास्तवात स्वत:ला सिद्ध करत आहेत.”
“सध्या सर्वकाही चांगले सुरू आहे. पण भारतीय संघाविरुद्ध आमची अग्निपरिक्षा असेल. कारण आम्ही जगतील सर्वात बळकट संघाविरुद्ध खेळणार आहोत. तरीही मी आताही झिम्बाब्वेकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा करत आहोत आणि वास्तवात चांगल्या प्रतिस्पर्धेची अपेक्षा करत आहोत”, असेही ह्यूटन म्हणाले.
सिकंदर रझाचेही केले कौतुक
झिम्बाब्वेचा फलंदाज सिकंदर रझा (Sikandar Raza)हा सध्या जबरदस्त प्रदर्शन करत आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध सलग २ वनडे सामन्यात २ शतके केली आहेत. रझाबद्दल बोलताना ह्यूटन म्हणाले की, “रजा सध्या अद्भुत फॉर्मात आहे. अशा खेळाडूचे संघात असणे फायदेशीर ठरते. कारण असा एक खेळाडू संघात असल्याने इतरांनाही हिंमत मिळते. अचानक इनोसेंट कायाने शतक केले. मग रेगिस चकाब्वाने पुढील सामन्यात आपले पहिले वनडे शतक झळकावले.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा पाकिस्तानी यष्टीरक्षकाला मारायला निघालेला गौतम गंभीर, पण कॅप्टनकुलने शांत केलेले वातावरण
वेस्ट इंडिजची पुन्हा घसरगुंडी! भारतानंतर न्यूझीलंडकडून टी२० मालिकेत लाजिरवाणा पराभव
भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे वनडे क्रिकेटमध्ये इतिहास