क्रिकेटजगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मागील वर्षी झिम्बाब्वेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला स्पॉट फिक्सिंगची ऑफर देणाऱ्या चाहत्यावर झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने पाच वर्षाची बंदी घातली आहे. हा चाहता आता कोणताही क्रिकेट सामना मैदानात उपस्थित राहून पाहू शकणार नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात एका भारतीय सट्टेबाजाचा देखील समावेश आहे.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात एका चाहत्याने झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू ल्युक जॉंगवे याला स्पॉट फिक्सिंग करण्याची ऑफर दिली होती. त्याने या कामासाठी तब्बल 7000 अमेरिकन डॉलर्स देण्याचे म्हटलेले. मात्र, जॉंगवे याने तात्काळ त्यास नकार देत याची कल्पना आयसीसीच्या लाचलुचपत विभागाला दिली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता दिसून आले की, एडवर्ड वॉल्टर मुपीगानो या चाहत्याने ही ऑफर दिलेली. या प्रकरणात त्याला एका भारतीय सट्टेबाजाचा वरदहस्त होता. ही डील झाल्यानंतर एडवर्ड्स याला 3000 अमेरिकन डॉलर्स मिळणार होते.
या प्रकरणाच्या तपासाअंती झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जाहीर करत म्हटले, आम्ही एडवर्ड याच्यावर कारवाई करत आहोत. तो पाच वर्ष कोणत्याही प्रकारचे क्रिकेट स्टेडियममध्ये येऊन पाहू शकणार नाही. त्याने आपल्यावरील सर्व आरोपांचा स्वीकार केला आहे. भ्रष्टाचार हा कोणत्याही खेळाची प्रतिमा मलिन करत असतो.
ल्युक जॉंगवे याच्याबद्दल सांगायचे झाल्यास तो सध्या झिम्बाब्वे संघाचा नियमित सदस्य आहे. 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या जॉंगवेने झिम्बाब्वेसाठी 1 कसोटी, 37 वनडे व 45 टी20 सामने खेळले आहेत. मागील वर्षी ऑस्ट्रेलिया झालेल्या टी20 विश्वचषकात झिम्बाब्वेने चांगली कामगिरी केली होती. जॉंगवे त्या संघाचा देखील भाग होता.
(Zimbabwe Cricket Board Impose 5 Years Ban On Cricket Fan Who Offer Spot Fixing To Cricketer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इमर्जन्सीमध्ये संघात आला आणि विराटची ‘ड्रीम विकेट’ घेऊन गेला, कुह्नेमनचे दमदार पदार्पण
जबरदस्त! जिमी अन् ब्रॉडचा जागतिक क्रिकेटमध्ये राडा, मोडला वॉर्न-मॅकग्रा जोडीचा ‘तो’ World Record