भारतीय संघाचे चाहते संघ विदेशी दौऱ्यावर आला की ते नेहमीच वेगवेळ्या प्रकारे त्यांना आपला पाठींबा दर्शवितात. त्याच्याच प्रत्यय झिम्बाब्वे दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला (ZIMvsIND) आला आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहेत. यातील पहिला सामना गुरूवारी ( १८ ऑगस्ट) हरारे येथे खेळला जात आहे. या सामन्याआधी भारतीय संघाने कसून सराव केला आहे. त्यांचा सराव पाहण्यासाठी चाहत्यांनी गेटबाहेर मोठी गर्दी केली होती.
संघाचे चाहते त्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवत असतात. या मालिकेत भारताचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत आहे. त्यालाही एका चाहत्याचा असाच अनुभव आला आहे. त्या युवा चाहत्याचे राहुलने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
राहुल सराव करत असताना त्याला भेटायला एक युवा चाहता आला. त्या मुलाने आधी राहुल आणि इशान किशन (Ishan Kishan) यांच्यासोबत फोटो काढले. नंतर तो म्हणाला, “तो राहुलचा खूप मोठा चाहता आहे.” राहुलने त्याला विचारले, “उद्या सामना पाहायला येणार का?” त्या मुलाने होकारार्थी मान हलवली आणि हसत म्हणाला “येणार ना, शाळा गेली खड्ड्यात.” त्याचे हे उत्तर एकून चकीत झालेल्या राहुलने त्याला तसे करण्यास मनाई केली. मग त्या मुलानेही पुढे म्हटले, “तसेही उद्या शाळेत काही महत्वाचे आहे पण नाही.”
खालील दिलेल्या व्हिडिओमध्ये राहुल आणि त्या युवा चाहत्यामध्ये झालेले संभाषण,
भारतीय संघ तब्बल सहा वर्षानंतर झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला आहे. २०१६मध्ये भारत एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेला आला होता. तेव्हा राहुलने वनडे पदार्पण करत नाबाद शतकी खेळी केली होती.
राहुल मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात परतला आहे. दुखापतीमुळे त्याला घरच्या आणि बाहेरच्या मैदानावरील अनेक मालिकांना मुकावे लागले होते. आता तो रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करत असून त्याच्याकडून विशेष कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी झिम्बाब्वेने १९.२ षटकात ५ विकेट्स गमावत ७७ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेतेश्वर पुजाराची स्फोटक फलंदाजी सुरूच! दोन शतकांनतंर पुन्हा एकदा केली उल्लेखनीय खेळी
INDvsZIM: नाणेफेकीत राहुलची बाजी, दीर्घ काळानंतर भारतीय संघात ‘या’ खेळाडूचे पुनरागमन
‘मी कोण आहे, त्याच्याशी माझी तुलना करणारा’, धोनीबद्दल केएल राहुलची हृदयास भिडणारी प्रतिक्रिया






