---Advertisement---

धोनीच्या लाडक्या लेकीचा हटके अंदाज! पुलसाईडला मोनोकिनीतील क्यूट फोटो व्हायरल

On: बुधवार, डिसेंबर 22, 2021 3:21 PM
Ziva Singh Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी  (MS Dhoni)याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तो सध्या आयपीएल स्पर्धा खेळताना दिसून येत असतो. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरीदेखील त्याची लोकप्रियता कमी झाली नाहीये. एमएस धोनी सह त्याची मुलगी झिवा धोनी देखील लोकप्रिय स्टारकीड आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. नुकताच तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या चर्चेचा विषय ठरतोय. (Ziva Singh Dhoni instagram post)

झिवा धोनीचे अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट आहे. ज्यावर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. या अकाऊंटवर तिचे क्यूट फोटो शेअर केले जातात. नुकताच तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती पुलमध्ये मस्ती करताना दिसून येत आहे. या फोटोमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाची प्रिंट असलेला मोनोकिनी परिधान केला आहे. या फोटोवर कॅप्शन देत तिने, ‘हॉलिडे’ असे लिहिले आहे. या फोटोला अवघ्या काही तासातच २ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे.

झिवा धोनी सध्या आपल्या आई-वडिलांसोबत दुबईमध्ये सुट्ट्यांच्या आनंद घेत आहे. एमएस धोनी आणि साक्षी सिंग दोन्ही आपल्या क्यूट मुली सोबत नेहमी सुट्ट्यांच्या आनंद घेण्यासाठी फिरायला जात असतात. ते नेहमीच मस्ती करताना दिसून येत असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर एमएस धोनी आपला संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत घालवताना दिसून येत असतो.

https://www.instagram.com/p/CXvTpjOPNai/?utm_medium=copy_link

झिवा धोनीचे इंस्टाग्राम अकाऊंटवर २ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. तिचं इंस्टाग्राम अकाऊंट साक्षी धोनी आणि एमएस धोनी मिळून हँडेल करतात. या अकाऊंटवर तिचे क्यूट फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातात. तसेच चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देत असतात.

महत्वाच्या बातम्या :

“कपिल देव यांची गोलंदाजी ॲक्शन कॉपी करण्यासाठी ६ महिने करावा लागला ४ तास सराव”

आर्चरच्या दुखापतीबाबत आले मोठे अपडेट; आयपीएलसाठी असणार का उपलब्ध? वाचा सविस्तर

झहीर म्हणतोय, “भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणात ‘ही’ कमतरता”

हे एकदा पाहाच :

ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय 'बॅच ऑफ १९९६' | Indian Cricket Batch of 1996

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---