---Advertisement---

झ्लाटन इब्राहिमोविचने केली गोलची हॅट्रिक, मेजर लीग सॉकरमधील त्याची पहिलीच हॅट्ट्रीक

On: सोमवार, जुलै 30, 2018 6:40 PM
---Advertisement---

स्वीडनचा माजी फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविच याने मेजर लीग सॉकरमध्ये त्याची पहिलीच तर एल ए गॅलक्सीच्या इतिहासातील 20वी हॅट्ट्रीक केली आहे.

अमेरिकेत सुरू असलेल्या या स्पर्धेत एल ए गॅलक्सीने इब्राहिमोविचने केलेल्या हॅट्ट्रीकच्या जोरावर ओरोलॅंडो सिटीला 4-3ने पराभूत केले.

36 वर्षीय, इब्राहिमोविच याने एल ए गॅलक्सीकडून खेळताना 17 सामन्यात 15गोल केले आहेत. त्याने मार्च महिन्यातच या संघात पदार्पण केले असून मागील 9 सामन्यात 12 गोल केले.

https://twitter.com/MLS/status/1023781778308378625

तसेच 2017 नंतर त्याची ही पहिलीच हॅट्ट्रीक आहे. त्याने ही हॅट्ट्रीक युरोप लीगमध्ये मॅंचेस्टर युनायटेड कडून खेळताना सेंट इटीन्ने विरुद्ध केली होती. हा सामना युनायटेडने 3-0 असा जिंकला होता.

या सामन्यात त्याने 47, 67 आणि 71व्या मिनिटाला हे गोल केले. तसेच एल ए गॅलक्सीने मागील दहा पैकी नऊ सामन्यात विजय मिळवला आहे.

https://twitter.com/LAGalaxy/status/1023791889336565760

स्वीडनच्या फुटबॉल इतिहासात आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल करण्यात इब्राहिमोविच पहिल्या स्थानावर आहे. त्याने 116 सामन्यात 62 गोल केले आहेत.

1 ऑगस्टला मेजर सॉकर लीग एकादश विरुद्ध जुवेंट्स हा सामना होणार असून यामध्ये इब्राहिमोविचचा मुकणार आहे.

तसेच एल ए गॅलक्सीचा पुढील सामना रविवारी (5जुलै)ला कोलोरॅडो विरुद्ध आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

डेव्हिड लुइझला चेल्सीतच राहून सॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायचे आहे

गोल करताना रुनी जखमी, नाकाला पडले ५ टाके

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment