दि.25 फेब्रुवारी 2023 पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत आशियाई स्नुकर सुवर्णपदक विजेता/जागतिक विजेता लक्ष्मण रावत, ध्वज हरिया, अनेकवेळा राष्ट्रीय विजेता देवेंद्र जोशी, राष्ट्रीय विजेता मनन चंद्रा, शाहबाज खान, जागतिक सुवर्णपदक विजेता एस कृष्णा, अनेकवेळा राष्ट्रीय विजेता आलोक कुमार, दिग्विजय कडीयन, क्रिश गुरबक्सानी, जागतिक स्नूकर स्पर्धेतील कांस्य पदक विजेता शिवम अरोरा, शोएब खान, राहुल सचदेव यांसारखे अव्वल मानांकित खेळाडू सहभागी होणार असून स्पर्धेत 30 संघ सहभागी होत आहे. ही स्पर्धा दि.27 फेब्रुवारी ते 6 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे.
बिलियर्ड्स अँड स्नुकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने होणारी हि स्पर्धा पी वाय सी क्लब येथे होणार आहे. एटीसी ग्लोबल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शंतनु भडकमकर, एसीएलचे संचालक आशुतोष साठे यांनी सांगितले की या स्पर्धेत प्रथमच साडे चार लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आहे. या स्पर्धेत दिल्ली, लखनौ, चैन्नई, मध्यप्रदेश, कोलकत्ता, तामिळनाडू, हैद्राबाद या राज्यातून व महाराष्ट्रातून पुण्यासह मुंबई, ठाणे, वाशी, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद या ठिकाणाहून असे एकूण 30 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत सुमारे 250 हून अधिक खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे व मानद सचिव सारंग लागु म्हणाले की, गेली 13 वर्षे एटीसी ग्लोबल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड व असोसिएटेड कंटेनर लाईन प्रायव्हेट लिमिटेड यांचे या स्पर्धेला प्रायोजकत्व लाभले असून यामुळे शहरांतील क्यु स्पोर्टस् खेळाच्या प्रसारासाठी मोलाची मदत मिळत आहे. तसेच, याशिवाय ही स्पर्धा सलग 13 वर्षे आमच्या क्लबमध्ये यशस्वीरित्या पार पडत असल्यामुळे आम्हांला खुप आनंद होत आहे.
सारंग लागु यांनी सांगितले की, स्पर्धेची लोकप्रियता वर्षागणिक वाढत असून आता स्पर्धेला राष्ट्रीय स्पर्धेचे स्वरूप आले आहे. पहिल्या वर्षी स्पर्धेत केवळ 18 संघ सहभागी झाले होते, या वर्षी 30 संघ स्पर्धेत झुंझणार आहेत. स्पर्धेत पीवायसीचा राजवर्धन जोशी, योगेश लोहिया, विजय निचानी, अभिषेक बोरा, अभिजीत रानडे, तहा खान यांसारखे शहरांतील अव्वल मानांकित खेळाडू झुंजणार आहेत.
स्पर्धेचे संचालक सलिल देशपांडे म्हणाले की, ही स्पर्धा साखळी व बाद फेरीत होणार असून साखळी फेरीचे सामने 3 फ्रेम्सचे तर बाद फेरीचे सामने 5 फ्रेम्सचे होणार आहेत. एकूण 30 संघांचे 8 गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. बीपीसीएल इंजिनियर्स, द बॉईज, कॉर्नर पॉकेट शूटर्स, पीवायसी जायंट्स, कॉर्नर पॉकेट लायन्स, कॉर्नर पॉकेट अ, ड्रॅगन बॉल, डेक्कन टायगर्स, ग्रीन बेझ क्लब, पुना क्लब, एमआयजी स्ट्रायकर्स असे पुण्यातील मानांकित संघही स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असून स्पर्धेत चुरस निर्माण करणारे आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 1 लाख 50 हजार रूपयांचे पारितोषिक, तर उपविजेत्या संघाला करंडक व 80 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. यासह उपांत्य फेरीतील संघाला 40 हजार रूपये व करंडक; उपांत्यपुर्व फेरीतील संघाला 20 हजार रूपये व करंडक देण्यात येणार आहे. स्पर्धेत हायेस्ट ब्रेक नोंदविणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला 15 रेडमध्ये 10 हजार रुपये, तर 6रेड स्नूकरमध्ये 5 रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
या स्पर्धेच्या संयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयोजन समितीत अशोक शेट्टी, सलिल देशपांडे, अरूण बर्वे, राजवर्धन जोशी, आदित्य देशपांडे, कपिल खरे यांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच राजीव खांडके, क्रेझॉल डिसिल्वा व रोहन साकळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वतः च्याच हळदीत ‘लॉर्ड’ शार्दुल झाला झिंगाट! बेफाम डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सात कर्णधारांनी भारतात नाही जिंकली एकही कसोटी, विश्वविजेते तिघेही पराभूत